Baramati By Election Voting percentage decreased Sunetra Pawar get record-breaking votes : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खरंतर या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवा याच एकमेव प्रबळ उमेदवार होत्या. तसेच अजित पवारांच्या निधनानंतर सर्वच पक्षांनी त्यांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून आणण्यासाठी कंबर कसली होती. मात्र मतदानाच्या टक्केवारीचा आकडा हा 2024 च्या तुलनेत घटल्याने सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतं मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
2024 च्या तुलनेत बारामतीत मतदानाची टक्केवारी घटली!
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभर मोठी शोककळा पसरली होती. त्यानंतर लागलेली बारामती पोटनिवडणूक ही सर्वांसाठीच भावनिक विषय होता. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र भावनिक वातावरणामध्ये देखील मतदारांमध्ये निरूत्साह असल्याचं दिसून आलं.
इराणमध्ये असलेल्या भारतीयांनो तात्काळ देश सोडा! ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतीय दुतावास अलर्ट मोडवर
कारण सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संपली. तोवर केवळ 58.27% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा घटलेला आहे. कारण 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मध्ये 71.86 टक्के मतदान झालं होतं.त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा आकडा हा 2024 च्या तुलनेत घटल्याने सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतं मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
