Baramati & Rahuri By Election : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबाबत (Baramati & Rahuri By Election ) मोठी घडामोड समोर आलीयं. या दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती, मात्र, काँग्रेस दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आलीयं. बारामती विधानसभेतून दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीकडून निवडणूक लढवणार असून राहुरी विधानसभेत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. आता काँग्रेस पोटनिवडणूक लढवणार असल्याने दोन्ही मतदारसंघाच्या बिनविरोध निवडीला पूर्णविराम लागलायं. या दोन्ही उमेदवारांसमोर काँग्रेसच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे.
मुसळधार पावसाने पुणे जलमय; जंगली महाराज रोड, स्वारगेट, वारजे भागात पाणी साचलं, वाहनचालक त्रस्त
दिवंगत उपमुख्यंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. तर दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली. निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांकडून जोरदार सुरु झाल्या आहेत.
महाकाव्याचा महाआरंभ: नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’ मधील रामाची पहिली झलक प्रदर्शित!
बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. एकीकडे महायुतीकडून उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतमध्ये तर राहुरीत अक्षय कर्डिले निवडणूक लढवणार आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी, असं सूचक विधान केलं होतं. मात्र, आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील मिळाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही? याचीच चर्चा सध्या रंगलीयं.
राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची भूमिका आहे, मात्र, पोटनिवडणूक लढवण्यासही आम्ही तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यांनतर राहुरी पोटनिवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.
