Download App

मोठी घडामोड! वाल्मीक कराडच्या पत्नीची CID चौकशी; नेमकं कारण काय?

फरार संशयित वाल्मीक कराड यांच्या पत्नीची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेला 18 दिवस उलटून गेले तरीही आरोपी मोकाट आहेत. या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात आती सीआयडीने देखील काम सुरू केले आहे. फरार संशयित वाल्मीक कराड यांच्या पत्नीची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कराड यांचे दोन अंगरक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचीही चौकशी करण्यात येत आहे.

बीड प्रकरणाचा तपास होईपर्यंत कुणीही मुंडे सत्तेत नसावा; कारवाई होणार नसेल तर गृहमंत्री जबाबदार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. तरी देखील मारेकऱ्यांना गजाआड करता आलेलं नाही. विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देत या प्रकरणाची न्यायायलयीन आणि एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल असे सांगितले होते.

प्रत्यक्षात मात्र या घटनेतील मुख्य आरोपी अजूनही फरारच आहेत. तरी देखील पोलीस यंत्रणांकडून तपास सुरूच आहे. त्यातच या प्रकरणात सीआयडीची एन्ट्री झाली आहे. सीआयडीने वाल्मीक कराड यांची पत्नीची कसून चौकशी केली. याचबरोबर वाल्मीक कराड यांचे अंगरक्षक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचीही चौकशी करण्यात येत आहे.

सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत. सीआयडीचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी देखील बीडला भेट दिली होती. यानंतर वाल्मीक कराड यांच्या पत्नीची जवळपास 40 मिनिटे चौकशी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि वाल्मीक कराड यांचे अंगरक्षक वाल्मीक कराड यांच्या संपर्कात आहेत का, त्यांच्याबाबत त्यांच्याकडे काही माहिती आहे का याचीही माहिती घेण्यात येत आहे.

बीड प्रकरणाचा तपास होईपर्यंत कुणीही मुंडे सत्तेत नसावा; कारवाई होणार नसेल तर गृहमंत्री जबाबदार

follow us