महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) फॉर्म्युला तयार केला आहे. तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात 16-16 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकत आहे, तिथे त्या पक्षाला प्राथमिकता देऊ, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नाराजी व्यक्त केली. मविआतील सगळ्याचं पक्षांनी माध्यमांना सांगितले की, समसमान जागा वाटप झाले. मात्र, मविआतील वरिष्ठ नेत्यांच्या स्वतंत्र मुलाखती पाहिल्या तर ते समसमान जागा वाटपाच्या भूमिकेऐवजी ते वेगळंच काहीतरी बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशात युती आणि आघाडीत कोणता पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार यावर याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्याने माविआच्या जागा कशा वाटल्या जातील, याबाबत चर्चा होत होती. आता महाविकास आघाडीचे लोकसभेचे फॉर्म्युला समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाली असून तीन्ही पक्षांनी समसमान जागा लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील यांनी सांगितले की, आम्ही सध्या कोणताही फॉर्म्युला बनवला नाही. प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकत आहे, तिथे त्या पक्षाला प्राथमिकता देऊ, असं सांगितलं.
मातोश्री वर खलबतं! ठाकरे गटाच्या वाघीण सुषमा अंधारे लोकसभेत नवनीत राणांशी भिडणार?
तर नाना पटोले यांनी याविषयी बोलतांना सांगितलं होत की, याबाबत केवळ प्राथमिक चर्चा झाली. अद्याप कोणातही निर्णय झाला नाही, असं सांगितलं.
दरम्यान, आज ठाकरे गटाच्या बैठकीनंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जयंत पाटलांच्या आणि नाना पटोलेंच्या या वक्तव्यावर बोलतांना भास्कर जाधव यांनी सांगितले की, नाना पटोले यांनी एका दैनिकाला दिलेली मुलाखत तर जंयत पाटील यांचे बाईट्स पाहिले, तर मविआच्या संयुक्त बैठकित हे नेते समसमान जागावाटपावर चर्चा करतात. माध्यमांना सांगतात की, आम्ही समसमान जागांवर लढणार आहोत. मात्र, स्वतंत्र मुलाखतीत हे नेते वेगळेच काहीतरी बोलत आहेत. आगामी निवडणुकीविषयी वेगळंच धोरण मांडत आहेत, ह्या स्वतंत्र मुलाखती काही तरी वेगळंच दर्शवत असल्याचं जाधव यांनी सांगितलं.