नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवला या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे. मात्र या ठिकाणी आता ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकालांमध्ये भुजबळांना मात देत ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
त्यामुळे येवला या मतदारसंघात सात पैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय मिळवता आला आहे. नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यातील तब्बल 188 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले असून या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.
यामध्ये पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे यासह अनेक ठिकाणी महत्त्वाच्या लढती आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. सुहास कांदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दुसरीकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात निकालांचे वैशिष्ट्ये पाहायला मिळतय. नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्यासंघटनेने गेल्या ग्रामपंचायत निवडणुकांप्रमाणे याही वेळी आपले खाते खोलले आहे. तर या निकालांमध्ये काही ठिकाणी धक्कादायक निकाल हाती आले आहेत तर काही ठिकाणी प्रस्थापितांनी आपले गड कायम राखलेले आहेत.
![3[1]](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2022/12/31-1-1024x576.png)