…म्हणून आई-वडिलांची शपथ घ्यावी लागते; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा

Chandrashehar Bawankule attack On Udhdhav Thackeray :  भाजपाशी बेईमानी केल्यावर त्यांच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले […]

Letsupp Image   2023 07 10T184731.514

Letsupp Image 2023 07 10T184731.514

Chandrashehar Bawankule attack On Udhdhav Thackeray :  भाजपाशी बेईमानी केल्यावर त्यांच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

बावनकुळे म्हणाले की, “2019 मध्ये मतपेटीनेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असा कौल दिला होता.जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर न येऊ देता तुम्ही शरद पवार सोबत कट करून सत्तेवर आले. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भावासारखा सांभाळले. त्यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवारांच्या कटाला साथ द्यायची होती तिथे त्यांनी साथ दिली.”

काका-पुतणे येणार एकाच मंचावर; PM मोदी, CM शिंदेंच्या उपस्थितीत होणार भेट

तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीच्या पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे. मुख्यमंत्री झाल्यावर केवळ दोन दिवस मंत्रालयात येत असेल तर हा महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा अपमान आहे. त्यांच्याकडे नेते नाही आणि माणसेही नाहीत त्यामुळे मीडियाच्या माध्यामतून ते भाजपावर टीका करीत आहे, असे म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.

Eknath Shinde : आमची युती 25 वर्षांची राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागेल….

दरम्यान, उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी यवतमाळ येथे सभा घेतली. तर आज अमरावती येथे त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी आपल्या सभेतून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या टिकेला बावनकुळेंनी जोरदार उत्तर दिले आहे.

Exit mobile version