Sujay Vikhe BJP : भाजपचे अहमदनगर दक्षिणचे खासदार हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे-थोरात गटाने विखे यांच्या पॅनेलचा पराभव केला. यानंतर सुजय विखे यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. आजी-माजी आमदार तुमच्या संपर्कात आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर सुजय विखेंनी थेट भाष्य केले.
माझे मैत्रीपूर्ण संबंध सगळ्यांशी आहे. जब दोस्ती को रिश्तेदारी मे बदलने का वक्त आयेगा तब बदलेंगे, असे म्हणत विखेंनी इतर नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केले आहे. तसेच आत्ताच मला एक पारनेरचा कॉल येऊन गेला. तुम्ही काळजी करु नका, सगळं होईल. अहमदनगर जिल्ह्यातील आजी माजी आमदार संपर्कात आहेत. परंतु अजून आमची फक्त मैत्री आहे. ज्यावेळेस संपूर्ण विचार केला जाईल त्यावेळेस नक्कीच त्यांची नाव उघड करू खासदार सुजय विखे म्हणाले.
राष्ट्रवादीला ठोकला रामराम; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा बीआरएसमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असलेल्या बातम्या सध्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. यावर बोलताना विखे म्हणाले की, जेवढे जास्त लोक पक्षात येतील तेवढं चांगलं आहे. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. त्यावर मी बोलणे उचित होणार नाही. नगर शहरातील आजी माजी आमदार संपर्कात आहेत अजून आमची फक्त मैत्री आहे. वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल, असे विखे म्हणाले.
दरम्यान, भाजपचे खासदार सुजय विखे आणि पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये कायम शाब्दिक चकमक उडत असते. निलेश लंके यांनी पारनेरचे तत्कालीन आमदार विजय औटी यांचा पराभव केला होता.