Download App

संजय राऊत वैफल्यग्रस्त, लोकही त्यांच्या बोलण्याला किंमत देईना; गिरीश महाजनांची घणाघाती टीका

  • Written By: Last Updated:

Girish Mahajan on Sanjay Raut : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील वर्षात देशभर लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिलेत. अशातच आगामी निवडणुकांबाबत आज अजेंडा 2024 भारत विरुद्ध खलिस्तान या सामना अग्रलेखातून भाजपवर (BJP) टीका करण्यात आली. यावरून आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) जोरदार टीका केली.

राम मंदिरात 2024 मध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, त्या कार्यक्रमाला देशभरातून हिंदू लोक हजेरी लावण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमा दरम्यान, दंगली घडवून आणल्या जातील. त्यात काही हिंदू-मुस्लीम लोक मारले जातील आणि त्याच मुद्द्यावर आगामी निवडणुका होतील, अशी टीका विरोधक करायचे. दरम्यान, आता सामना अग्रलेखात 2024 च्या निवडणुकांचा तो अजेडा झाला तर खलिस्तान्यांच्या नावावर एखादं नवं पुलवामा घडवण्याची कुवत येथील राजकारण्यांत आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली.

याविषयी गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, आता 2024 मध्ये राम मंदिर उघडेल. मग तिकडे दंगली होती. खलिस्तान निर्माण होईल. कुठं काश्मिर तयार होईल. देश पेटेल. पुलवामा परत होईल. अशा कपोलकप्लित गोष्टी हे नेते बोलत असतात. संजय राऊतांच्या बोलण्याला काही किंमत नाही. संजय राऊत हे सध्या वैफल्यग्रस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली.

तीन महिने विधानसभा अध्यक्षांनी काय केलं; रोहित पवारांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल 

महाजन म्हणाले की, संजय राऊत हे सध्या वैफल्य ग्रस्त आहेत, ते मनात येईल तसे ते बोलत असतात. वाट्टेल तसे ते सकाळ झाली की बोलायला सुरुवात करतात. ते भडक आणि बालिश स्टेटमेंट करतात. त्यामुळे लोकसुद्धा त्यांना आता महत्त्व देत नाही, असा टोला महाजन यांनी लगावला.

एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला तर भाजपला मोठे परिणाम सोसावे लातील, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, बच्चू कडू आणि संजय राऊत हे मोठे भविष्यकार आहेत. ते पुढचं सांगत असतात. बच्चू कडू हे तर आमचे सहकारी आहेत. ते असं का बोलले, ते ठाऊक नाही. पण, संजय राऊतांच्या बोलण्याताला काही किंम नाही, असं महाजन म्हणाले.

Tags

follow us