Download App

‘सामना’तून रामदेव बाबांवर टीका, नितेश राणे म्हणाले, ‘हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार…’

  • Written By: Last Updated:
Image Credit: nitesh rane

Nitesh Rane On Samana : ठाकरे गट आणि भाजप (BJP) यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. योगगुरू बाबा रामदेव यांनी काशीमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या मुखपत्र सामनातून सत्ताधारी आणि बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर टीका केली. रामदेव बाबा व भाजपच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी चिंता वाटते, ती पोकळ असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टीका केली. अॅड स्वरूपात आर्थिक लाभ मिळण्यासाठी केलेली ही ब्लॅकमेलिंग असल्याची टीका राणेंनी केली.

आज नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सामनातील अग्रलेखावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, सामनामध्ये रामदेव बाबा, पतंजलीलवर अग्रलेख लिहिला आहे. सनातन धर्म, मोक्ष याचा उल्लेख अग्रलेखात असला तरी हा अग्रलेख पतंजलीकडून काही आर्थिक लाभ ऍड स्वरूपात मिळतोय का? यासाठी केलेली ब्लॅकेमेलिंग आहे. सामनाला सरकारकडून कोणताही महसूल नाही. हा पेपर डबघाईला आला आहे. म्हणून पतंजलीला ब्लॅकमेल केल जातं आहे, असा आरोप राणेंनी केला.

राजस्थानच्या राजकारणात CM शिंदेंची एन्ट्री; भाजपसाठी आव्हान की काँग्रेसची वाट बिकट होणार? 

काही दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना नितीन देसाईंचा स्टुडिओ हवा होता. त्यासाठी देसाईंना ब्लॅकमेल करण्यात आलं होतं, असा आरोप केला होता. आताही त्यांनी या विधानाचा पुनरुच्चार केला. या आधी नितीन देसाई यांचा स्टुडिओ यांना हवा होता, त्यासाठी त्यांना धमक्या देण्यात आल्या. आता पतंजलीला ब्लॅकमेल केलं जातंय, काही दिवसात सामनामध्ये पतंजलीची जाहिरात आली तर आश्चर्य वाटणार नाही. सनातन धर्म किंवा हिंदू धर्म यावर यांना काही देणेघेणे नाही. ब्लॅकमेल करून पैसे हवेत, असं राणे म्हणाले.

सामना अग्रलेखात काय म्हटलं?
काशीमध्ये बोलताना बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावर सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. प्रख्यात उद्योगपती, योगाचार्य बाबा रामदेव यांनी सांगितलं की, जे सनातनला शिव्या देत आहेत, त्यांना 2024 साली मोक्ष मिळेल.
या मोक्ष उद्योगाचे ‘पेटंट’ पंतप्रधान मोदींनी उद्योगपती बाबा रामदेव यांना दिले असेल तर हा ‘मोक्ष’ उद्योग 2024 मध्ये कोलमडून पडेल. रामदेव बाबा व भाजपच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी चिंता वाटत आहे ती पोकळ तर आहेतच, परंतु, भंकप देखील आहे. त्यात राजकीय स्वार्थ आणि पेटवापेटवीशिवाय दुसरं काही नाही, अशी टीका केली होती.

Tags

follow us

वेब स्टोरीज