Download App

“बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने…” : ठाकरेंच्या टीकेवर शेलारांचा पलटवार

मुंबई : बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका, असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारसाठी ‘परदे श दौरा’ एक फॅशन बनली आहे. महाराष्ट्रातील मिंधे-भाजप राजवटीत मंत्री आणि अधिकारी यांच्या सुट्यांसाठी जनतेचा पैसा खर्च करणे सुरु आहे. यातून राज्यासाठी कोणताही फायदा होताना दिसत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. (BJP MLA Ashish Shelar responds to Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leader Aditya Thackeray’s criticism)

“करदात्यांच्या पैशावर मंत्र्यांची मजा” : आदित्य ठाकरेंनी काढला शिंदे सरकारच्या परदेश दौऱ्यांचा सातबारा

काय म्हणाले आशिष शेलार?

आदू बाळा,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्‍या अधिकार्‍यांचा खर्च केलेला आहे.

जपान दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्‍यामुळे आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी.

बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका !

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

गेल्या आठवड्यात, बेकायदेशीर मुख्यमंत्री सुट्टीसाठी जर्मनी आणि यूकेला भेट देणार होते, शिष्टमंडळ म्हणून मोठ्या संख्येने लोकांचा सरकारच्या अधिकृत दौऱ्यात सहभाग करुन घेतला. मी सोशल मीडियावर दौऱ्याचे तपशील, ते भेटणार असलेल्या गुंतवणूकदारांबद्दल किंवा ते भेट देणार असलेल्या ठिकाणांबद्दल विचारल्यानंतर, माझ्या सोशल मीडिया पोस्टच्या 30 मिनिटांत त्याच्या कार्यालयाने दौरा रद्द केला. त्यानंतर, 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणारे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना गेल्या 2 दिवसांपासून मी सोशल मीडियावर विचारणा केल्यानंतर, महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाही तत्त्वांना विलंब आणि न्याय नाकारल्याने त्यांना दौरा रद्द करावा लागला.

एकत्रित प्रवास, शेजारी जागा, जाहीर कौतुक : अजितदादांचा मंत्री सावलीसारखा पवार-सुळेंसोबत

उपमुख्यमंत्र्यांचा जपान दौरा ठाकरेंच्या निशाण्यावर :

उपमुख्यमंत्र्यांनी जपान सरकारच्या निमंत्रणावरुन जपानला भेट दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सरकारच्या निमंत्रणानंतरही, 5 दिवसांचा दौरा एमआयडीसीने प्रायोजित केला होता. सर्वसामान्यपणे, निमंत्रण आल्यानंतर त्या दौऱ्याचा खर्च यजमान उचलतात. इतकेच नव्हे तर, शिष्टमंडळाने परत आल्यानंतर एका महिन्याच्या आत म्हणजेच 25 ऑगस्टपर्यंत तपशीलवार अहवाल सादर करावा, असेही जीआरमध्ये नमूद केले होते. आता एका महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आम्ही उपमुख्यमंत्र्यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट व्यतिरिक्त कोणताही तपशीलवार अहवाल किंवा परिणाम पाहू शकलेलो नाही. मानद पदवी मिळवण्यासाठीच्या दौऱ्याचा खर्च एमआयडीसीला का करावा लागतो?

सर्वांच्या दौऱ्याची अजितदादांना विचारणा :

मुद्दा असा की, माझा त्यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. शिवाय, जर त्यांच्यापैकी कोणाला सुट्टीसाठी जायचे असेल तर त्यांनी जावे, परंतु करदात्यांच्या पैशावर नाही. राज्याला करदात्यांच्या पैशावर या सुट्ट्या परवडतील का, हे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट करावे. आणि जर आपण करू शकतो, तर राज्य सरकार जुनी पेन्शन योजना, शेतकरी समर्थन याबद्दल काही का बोलत नाही? सार्वजनिक पैसा अशा प्रकारे सुट्ट्यांवर खर्च होत असेल तर याबद्दल अर्थ मंत्रालयाने उत्तर दिले पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

Tags

follow us

वेब स्टोरीज