Download App

‘त्यांना फक्त पाहुण्यांना मोठ करायचं असतं’; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.

  • Written By: Last Updated:

Gopichand Padalkar Criticism on Sharad Pawar : गेली अनेक दिवसांपासून शांत असलेले गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसंच पाहिलं तर ते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीक करत असतात. दरम्यान, अजित पवार भाजपसोबत आल्याने त्यांची काहीशी कोंडटी झालेली आहे. मात्र, त्यांनी आता पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

PV Sindhu : पीव्ही सिंधूची विजयी सलामी; पहिल्या सामन्यात एफएन अब्दुल रझाकचा केला पराभव

शरद पवारांना काहीही करायचं नसतं. त्यांना फक्त मिजाजगिरी, मोठेपणा करायचा आणि मी खूप काही करतो असं भासवायचं असतं. पवारांना राजकारण करायचंय ते फक्त जवळच्या पाहुण्यांना मोठ करण्यासाठी असा गंभीर आरोप पडळकरांनी केला. तसंच, महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत कुठलंही व्हीजन दाखवलेलं नाही. त्यामुळे ते याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत अशी टीका भाजप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

काहीच दिलं नाही एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या, अत्याचाराचाही संशय; कर्नाटक सीमेवरून आरोपीला अटक

आज राज्यासह देशात दूध उत्पादक त्रस्त आहेत. रोजगारांचा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा उसाला भाव नाही, युवक शिक्षणापासून वंचित आहेत. असे असंख्य प्रश्न आहेत. दरम्यान, पवारांनी अनेक वर्षे त्यांनी महाराष्ट्राचं सत्ताकारण केलं. मात्र, उसाला दर, दुधाला दरवाढ त्यांनी कधीही दिलेली नाही. युवकांसाठी त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही, असा आरोप पडळकर यांनी पवार यांच्यावर केले.

follow us