Anil Bonde On Yashomati Thakur : इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ‘ठाकूर’ पदवी मिळाली, ठाकूरांमध्ये इंग्रजांचा ‘डीएनए’ असल्याचं विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे(Anil Bonde) यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीचं राजकारण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार नवनीत राणा यांनी ठाकूर यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन राणा-ठाकूर वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा बोंडे-ठाकूर वाद पेटणार असल्याची शक्यता आहे. अमरातवीत आयोजित ओबीसी यात्रेदरम्यान ते बोलत होते.
अनिल बोंडे म्हणाले, काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे. यशोमती ठाकूर यांनी इंग्रजांची चाकरी केली म्हणून त्यांना ‘ठाकूर’ पदवी मिळाली. ठाकूरांमध्ये इंग्रजांचा ‘डीएनए’,” असं खासदार अनिल बोंडे म्हणाले आहेत. सध्या अमरावतीत भाजपची ओबीसी यात्रा सुरु आहे. ही यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघ तिवसा येथे आली होती.
World Cup 2023: न्यूझीलंडसमोर नवख्या नेदरलँड्सचे आव्हान, पाहा प्लेइंग-11
भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरु असून ही यात्रा अमरावतीमध्ये होती. यानिमित्ताने अमरावती शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. यात्रेवरून यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली होती. त्या म्हणाल्या की, निवडणुका आल्या की भाजपला असे धंदे सुचतात. ठाकूरांच्या या टीकेवरुन बोंडे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
Chhagan Bhujbal : ‘चौकशी कसली करता मला माहित नाही’; दमानियांच्या आरोपांवर भुजबळांच स्पष्ट उत्तर
काही दिवसांपूर्वीच भाजपकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो रावणरुपात दाखवून समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. त्यावरुन यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला सुनावलं होतं. ठाकूर म्हणाल्या, भाजपचा DNA आणि नथुराम गोडसेंचा DNA एकच आहे. गोडसेंनी महात्मा गांधींनाही रावणाचं रूप दिलं होतं. त्यांनी महात्मा गांधींना मारायचा प्रयत्न केला.
संघ आणि भाजप हे सातत्याने असंच काहीतरी करत असतात. पण गांधी त्या युगातले असोत, की या युगातले असो गांधी हे गांधी आहेत. या देशाचा मूळ डीएनए गांधी हाच आहे. त्यांनी कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरणार नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये जी विकृती आहे. ती नष्ट झाली पाहिजे. यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे, असा आमचा आग्रह असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. गुजरात असो वा आपला देश असो, त्यांनी सातत्याने हेच केलं आहे.
निवडणूक कोणतीही असो, ते काय गोंधळ घालतील आणि विभाजन करायचा प्रयत्न करतील याचा नेम नाही. ते हे करू शकतात, त्यांच्याच पक्षातील काही मंडळी हे बोलत आहेत. ही वास्तविकता आहे. मागेही अशा गोष्टी घडल्या असल्याचं यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं होतं.