एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर पण भाजपकडून एक अट; ठाकरेंच्या निकटवर्तीय वकिलांचे खळबळजनक ट्वीट

Eknath Shinde-भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबविले आहेत. शिंदे यांनी ठाकरेसेनेचे सात खासदार फोडले आहेत. या खासदारांचा वेगळा गट स्थापन करण्यात आला आहे. हे सातही खासदार कधीही शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रामध्ये एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन वाढणार आहे. त्या बदल्यात शिंदेसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळू शकतो. परंतु उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय कायदेतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे (Asim Sarode) यांनी एक ट्वीट करत खळबळजनक दावा केलाय.


शरद पवारांची नात अन् सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती, वाचा संपूर्ण यादी

भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा, असे ट्वीट सरोदे यांचे आहे.


पुरूष व महिला क्रिकेट इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारी पहिलीच फलंदाज, टॉप फाईव्हमध्ये मिळवलं 1 नंबर स्थान

राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय ? असे सरोदे यांनीही ट्वीटमध्ये म्हटले आहे.

खासदारांचे संख्याबळ वाढल्याने शिंदेंची ताकद वाढणार
भाजपला कुठल्याही परिस्थितीत लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, लोकसभा व विधानसभेत महिलांना आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करून घ्यायचे आहे. त्यासाठी भाजपला दोन-तृतियांश बहुमत हवे आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत. उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फुटल्यानंतर शिंदेंकडे खासदारांची संख्या 13 इतकी होणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे केंद्रात वजन वाढणार आहे. त्याचा फायदा शिंदेंना होऊ शकतो.

Exit mobile version