Download App

बावनकुळे हे वर्षभर घरीच जाणार नाहीत; हर्षवर्धन पाटलांनी सांगितले नियोजन

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनाकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा झाली. सभेचे आयोजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होत. हर्षवर्धन पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. बावनकुळे हे भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखे कसे दौरे करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे याबाबत अनेक दाखले दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता त्यांना थेट जाऊन भेटू शकतो, असा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे अध्यक्ष भेटल्याच हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे.
आता एकनाथ शिंदे नाही तर डॉक्टर एकनाथ शिंदे
पाटील यांनी बावनकुळे यांचा आगामी वर्षातील दौरा कसा असणार आहे. त्याचीही चुणूक दाखवून दिली आहे. बावनकुळे हे आता सहा एप्रिलपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा इतका मोठा आहे की बावनकुळे आता थेट लोकसभा निवडणूक झाल्यावरच घरी जाणार आहेत. म्हणजेच ते तब्बल एक वर्ष घराच्या बाहेर असणार आहेत. या भाषणावरून एक लक्षात येते की आता ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा सुरु होत आहे. ही यात्रा सहा एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर भाजप राज्यभर प्रदेशाध्यक्ष यांच्या दौरा आणि सभाचे नियोजन करत आहे. पक्षांतर्गत बांधणीसाठी हे दौरे असणार आहेत.

Chandrakant Patil : माझी बायको कोकणस्थ, ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप चुकीचा

सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संथेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. हे पाहता याबद्दल कामकाजासाठी बावनकुळे व्यस्त असणार आहेत.
भाजपची कार्य करण्याची पद्धत पाहिली तर लोकसभेच्या तयारीला भाजप सप्टेंबरपासून सुरुवात करेल. त्यासाठी दिल्ली, मुंबई दौरे, पक्षश्रेष्ठी बैठका आणि उमेदवारी याबाबत भरगच्च कार्यक्रम अध्यक्ष या नात्याने बावनकुळे यांचे असणार आहेत. यानंतर जानेवारीपासून भाजपाच्या प्रचार यात्रा आणि पंतप्रधान यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय पोहचण्यासाठी यात्रा नियोजन अपेक्षित आहे. या सर्व गोष्टी पहिल्या तर भाजप अध्यक्ष बावनकुळे यांचा एक वर्षाचा भरगच्च कार्यक्रम तयार आहे, असंच हर्षवर्धन पाटील यांना सुचवायचे होत.

आगामी वर्षभराच्या नियोजनबाबत बावनकुळे यांच्या कार्यालयाला विचाराणा केली असता. सावरकर सन्मान यात्रा आणि महारष्ट्र दौरा वगळता सध्या कुठलही नियोजन अजूनही ठरलेल नाही. पण आगामी वर्षभराचे नियोजन होईल. पण ते सर्व पक्ष ठरवेल आणि पक्षाकडून जाहीर केले जाईल, असे बावनकुळे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.असे असले तरी आगामी काळात भाजपा कार्यपध्दती आणि प्रचार पाहता भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा कार्यक्रम भरगच्च राहिल हे नक्की.

Tags

follow us