Download App

CM शिंदेंच्या शिवसेनेचे राज ठाकरे पक्षप्रमुख होणार? महायुतीचा धडकी भरवणारा प्रस्ताव

  • Written By: Last Updated:

Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच केंद्रीय मंत्री अमित शा (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली होती. मनसे शिवसेनेत (shivsena) विलीन करा आणि शिवसेनेची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या, असा प्रस्ताव भाजपकडून राज ठाकरेंना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ठाकरे पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता कॉंग्रेसला सीट विकतात; आमदार भोडेंकरांचा गंभीर आरोप 

दिल्लीत झालेल्या बैठकीत शाह यांनी राज ठाकरे यांच्याशी व्यापक युती करण्याबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणूक आणि जागावाटपाव्यतिरिक्त चर्चा झाली. बाळासाहेबांच्या हिंदुत्वादी विचारांचे तुम्हीच खरे वारसदार आहात, त्यामुळं तुम्हीच शिवसेनेचे नेतृत्व करा, असा प्रस्ताव भाजपकडून राज यांना देण्यात आल्याची माहिती आहे. एका वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे

दोन वर्षापूर्वी शिवसेनेत बंडाळी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या एका गटाचे नेते झाले. तर दुसऱ्या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे हे अखंड शिवसेनेचे प्रमुख होते. सध्या शिंदे हे महायुतीचे घटक आहेत. दरम्यान, राज ठाकरेंनी महायुतीत सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.

जानकरांकडून `कात्रजचा घाट`; पवारांच्याही डोक्यात चक्रे फिरू लागलीत.. 

भाजप राज ठाकरेंकडे दीर्घकालीन सहकारी म्हणून पाहत आहे. ज्याचा राज्यात दोन्ही बाजूंना फायदा होईल असे सुचवण्यात आले होते. त्यानंतर राज यांना त्यांच्या मनसेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करून सेनेच प्रमुख होण्यास सांगण्यात आले, अशी माहिती एका सूत्रांनी दिली.

राज यांनी महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा जागांसाठी एनडीएचा प्रचार करावा. त्याच्या बदल्यात विधानसभेत त्यांना सन्मानजक जागा आणि सत्तेत वाटा देण्यात येईल, असा प्रस्ताव भाजकडून देण्याचं आल्याचंही सुत्रांनी सांगितलं.

सूत्रांनी सांगितले की, भाजपची योजना मुख्यमंत्री शिंदे यांना कळवण्यात आली असून त्यांना त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांमध्ये सहमती निर्माण करण्यास सांगितले आहे.

“शिंदे राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा देण्यास नाखूष आहेत. कारण त्यामुळे शिंदेच्या राजकीय कारकिर्दीचा अंत होऊ शकतो. मात्र, भाजपचे नेतृत्व आपल्या प्रस्तावावर ठाम आहे आणि त्यांनी शिंदे यांना आश्वासन दिले आहे की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे निकाल काहीही असले तरी त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले जाणार असा शब्द शिंदेंना भाजपकडून देण्यात आला आहे,’ अशी माहिती सुत्रांनी दिली.

follow us