BJP-Shiv Sena alliance is as strong as Ambuja cement, Sudhir Mungantiwar : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे राज्यातील अनेक ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लागले होते. तर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचेही भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले. पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा जिल्ह्यात मोठी बॅनरबाजी करण्यात आली. सर्व बॅनरवर पटोले यांचा ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, यावर आता भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मुनगंटीवर म्हणाले, बॅनरवर भावी मुख्यमंत्री लिहून कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यासाठी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करावे लागेल, मुंगेरीलाला के हसीन सपने अशी शब्दात त्यांनी पटोले यांच्यावर टीका केली. अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघर येथे आज अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे भूमिपूजन आज राज्यपाल रमेश बैस आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी मुनगंटीवार यांनी भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवरील नाना पटोले यांच्या बॅनरवर प्रतिक्रिया दिली.
दु:खद वार्ता, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टी शोकाकुल
मुनगंटीवर म्हणाले, मराठीत एक सुंदर कविता आहे. गणपत वाणी बिडी पितांना, चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन् मनाशीचकी, या जागेवर बांधील माडी, आता काही लोक माडी ऐवजी मुख्यमंत्री होण्याचे इमले बांधत आहेत. नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर आधी त्यांना महाविकास आघाडी सोडावी लागेल. राष्ट्रवादी सोबत राहून त्यांना काहीच होता येणार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.
मी भाजपची पण, भाजप थोडीच माझी आहे, मी वादळाची लेक आहे, अशी वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यामुळं पंकजा मुंडे या भापजात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं बोलल्या जातं. तर बाळासाहेब थोरातांनीही पंकजा यांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. पंकजाताईंसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले असल्याचे थोरात म्हणाले. यावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने आपले दरवाजे उघडले हे चांगले आहे, पंकजा मुंडे या दारातून प्रवेश करतील की नाही माहीत नाही. पण काँग्रेसचे अनेक नेते जातील, असा टोमना मारला.
भाजप शिंदे गटाला बाजूला करून भाजप निवडणूक लढणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा वापर करणार आहेत, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होतं. जाधवांच्या या वक्तव्याचा देखील मुनगंटीवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आमची युती शिंदेंच्या शिवसेना सोबत असून ती अंबुजा सिमेंट सारखी मजबूत आहे, सोनिया सेने सोबत आम्ही कधीच जाणार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.