छत्रपती संभाजीनगर : काल छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही सभा झाली असून या सभेला महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला होता. या सभेची चर्चा राजकीय वर्तृळात पाहायला मिळत असतांना आता संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा झाली, त्या मैदानाची गोमूत्र शिंपडूण शुध्दी केली आहे.
काल महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर आज भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून मैदानाची शुध्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जय श्रीराम…. जय श्रीराम…. असे नारे भाजप कार्यकर्त्यांनी लगावले. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितलं की, बाळासाहेबांनी याच ठिकाणी याच ठिकाणी हिंदुत्वाचा यज्ञकुंड पेटवला होता. आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मैदानावर सभा घेऊन हे मैदान अपवित्र केलं होतं. त्यासाठी आम्ही गोमूत्र शिंपडून मैदानाची शुध्दी करत आहोत, असं सांगितलं.
“लग्नापूर्वी बाहेर माझे अफेअर्स…”, वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा
ते म्हणाले की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या मैदानावर अनेक सभा घेतल्या होत्या. त्यांच्या पावन चरणांनी हे मैदान पवित्र झालं होतं. त्यांची आम्हाला शिकवण होती की, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या विरोधात आपल्याला निवडणूक लढवायची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला पूर्णपणे मातीत गाडायचं आहे. याच विचारांवर श्रद्धा ठेऊन आम्ही काम करत आलो. मात्र, उध्दव ठाकरेंनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन काल या पवित्र मैदानावर सभा घेतली. आणि हे मैदान अपवित्र केलं. आम्ही याचा निषेध करतो. त्यामुळं आता हे अपित्र झालेलं मैदानाची शुध्दी करण्यासाठी आम्ही गोमूत्र शिंपडत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.