कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मंत्री हसन मुश्रीफ यांनी उघड केले ‘एकजुटी’चे रहस्य

Minister Hasan Mushrif यांनी कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Minister Hasan Mushrif

Minister Hasan Mushrif

Both NCP together in Chandgad, Kolhapur Minister Hasan Mushrif revealed the secret of ‘unity’ : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांमधील आउटगोइंग आणि इन्कमिंग म्हणजेच पक्ष बदलांचे वारे जोराने वाहत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी विरोधी पक्षासोबत देखील युती आणि आघाडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. या युतीबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ?

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. या युतीबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, आमच्या पक्षाचे माजी आमदार राजेश पाटील यांची तक्रार होती की, अर्ज भरण्याची तारीख आली तरी देखील युतीसाठी भाजप , शिंदे गट कोणी बोलायला तयार नव्हतं. मग पाटील यांनी शरद पवार गटाच्या नंदाताई कुपेकर यांच्याशी चर्चा केली. त्यातून त्यांनी त्यानंतर राजर्षी शाहू आघाडी काल स्थापन केली. त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी उपस्थित होतो.

दिल्लीत बॉम्बस्फोट अन् पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, शांती प्रार्थना महोत्सवात होणार सहभागी

याबाबत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा मला फोन आला होता, पण त्यांनी यापूर्वी माझ्याशी चर्चा केली नव्हती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही. भाजपसोबत आणि शिवसेनेसोबतच चर्चा होईल. असंही यावेळी मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिलं. कोल्हापूर जिल्ह्यात हे समीकरण सगळीकडे नाही कागल आणि गडहिंग्लजमध्ये भाजपबरोबर बोलणं चालू आहे कागलमध्ये पवार साहेबांची राष्ट्रवादी छोटी आहे. आमची बोलणी भाजप सोबत सुरू आहे. असं यावेळी मुश्रीफ म्हणाले.

Exit mobile version