Download App

Amal Mahadik : बंटी पाटील घाबरले, त्यांच्याकडून बिंदू चौकात कोणीच आलं नाही

  • Written By: Last Updated:

Bunty Patil was scared, no one from them came to Bindu Chowk : राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकीय गट असलेले महाडिक आणि सतेज पाटील (Satej Patil) यांच्यात यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. सतेज पाटील विरूध्द धनजंय महाडिक हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. ही राजकीय लढाई आता वैयक्तीक पातळीवर येऊन पोहोचली. विशेष म्हणजे अमल महाडिक (Amal Mahadik) आणि सतेज पाटील यांच्यात शाब्दीक युध्द रंगले आहे. काल सतेज पाटील यांना बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. दरम्यान, अमल महाडिक यांनी यांनी चर्चेला येण्याची तयारी दाखवली. तर सतेज पाटील यांच्याकडून ऋतुराज पाटील चर्चेला येणार होते. मात्र, सतेज पाटलांकडून कोणीही चर्चेला आलं नसल्याचं अमल महाडिक यांनी सांगितलं.

कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना बिंदु चौकात या, हिशोब करू, असं थेट आव्हान दिलं होतं. राजाराम कारखान्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन मी बिंदू चौकात येतो, तुम्हीही डी वाय पाटील साखर कारख्यानचे कागदपत्र घेऊन बिंदू चौकात या, अशा शब्दात ललकारलं होतं. महाडिक यांचं आव्हान सतेज पाटील यांनी स्वीकारलं होतं. त्यामुळं पाटील गट आणि महाडिक गट आमने-सामने गट येणार होते.

उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे हे फायदे एकदा नक्की वाचाच

राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण पेटले आहे. त्यामुळं दोन्ही गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बिंदू चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांना कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार अमल महाडिक हे बिंदू चौकात दाखल झाले होते. मात्र, पाटील गटाकडून कोणीही आले नाही. आम्ही बंटी पाटलांची वाट पाहिली, पण ते आले नाहीत. काल माझ्या विरोधकांनी मला आव्हान दिलं होतं. त्यानुसार मी बिंदू चौकात दाखल झालो आहे. राजाराम साखर कारखान्याची निवडणूक आहे. ही व्यक्तीगत निवडणूक नाही. कारखान्याची संपूर्ण माहती महाराष्ट्राला कळण्यासाठी मी आव्हान दिलं होतं. मात्र, बंटी पाटील आले नाहीत, असं अमल महाडिक म्हणाले.

ते म्हणाले की, बंटी पाटील घाबरले आहेत. त्यांची नितिमत्ता खोटी आहे, त्यांनी त्यांच्या साखर कारखान्याची माहिती द्यावी, मी त्यांची 10 मिनिटे वाट पाहतो, असं अमल महाडिक म्हणाले.

अमल महाडिक येऊन गेल्यानंतर ऋतुराज पाटील बिंदू चौकात पोहोचले. यावेळी अमल महाडिक निघून गेले होते. ऋतुराज पाटील हे साडेआठ वाजता बिंदु चौकात पोहोचले होते.

Tags

follow us