Supriya Sule On Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावरून मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नसल्याची टीका करत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली.
https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI
आज एका पत्रकार परिषदेत बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात अनेक मोठी आव्हानं आहेत. महागाई, बेरोजगाई, पाण्याची कमतरता असे कितीतरी प्रश्न आहेत. अनेक भागात पाऊस झाला नसल्यामुळं पाण्याची पातळी खालावली आहे. अनेक भागात पंचवीस टक्कांहून कमी पाऊस झाला. आजघडीला पाण्याचा मोठा प्रश्न आहे. चाऱ्याची सोय नाही. दुष्काळ जाहीर करा, असं वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मात्र, शासनाकडून कोणत्याच उपाययोजना होत नाही, असं सुळे म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, जालन्याला लाठीचार्जची जी घटना झाली, ती फारच दुर्दैवी आहे. आरक्षणाच्या मागणीकडे सरकारने लक्ष घालायला हवं होतं, पण घातलं सनाही. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही. अमानुषपणे आंदोलकांना मारहाण झाली,पण त्याची ऑर्डर नेमकी आली कुठून? असा सवाला त्यांनी केला. हे गृहमंत्रालयाचं फेल्युअर आहे. आता केवळ एखाद्या पोलिसांवर रोष काढून काही होणार नाही. मंत्रायलाच्या गृहमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असं म्हणत आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जला गृहमंत्रालयालाच जबाबदार धरलं.
Pune News : ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’; पुण्यातही मराठा समाज रस्त्यावर
गृहमंत्री लाठीचार्जच्या दुसऱ्या दिवशी लडाखला गेले. राज्यात प्रचंड अस्वस्थता असतांना गृहमंत्री बाहेर जाऊच कसे शकतात? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारने जसं विशेष अधिवेशन बोलावंल, तसं दुष्काळ आणि आरक्षणाच्या बाबत राज्य सरकारने अविवेशन बोलावलं पाहिजे. मराठा समाजासह धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणावर व्यापक चर्चा व्हावी. भाजपने आरक्षण देऊ असं त्यांच्या जाहिरनाम्यात सांगितलं होतं, मग आता सरकारनं आरक्षणाबाबत गंभीर का नाही, असा सवाल त्यांनी केला.
ईडी, सीबीआय आणि पक्ष फोडण्यातच हे सरकार व्यस्त आहेत. राज्य सरकारमध्ये पॉलीसी पॅरालिसीस आहे. कारण एसटीत महिलांना आरक्षण दिलं. पण, अनेक गावात एसटीच पोहोचत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
संसदेने विशेष अधिवेशन बोलावलं. मात्र, त्याचा अजेंडा अद्याप ठरला नाही. याविषयी विचारले असता, सुळे म्हणाल्या की, संसदेचं अधिवेशन बोलावलं. मात्र, अविवेशनात क्वश्चन अवर नाही, झिरो अवर नाही. आम्ही सभागृहाचे सदस्य आहोत. मात्र, आम्हाला अद्याप अजेंडा दिला नाही. कोणत्या विषयावर अधिवेशन आहे, याची कल्पाना नाही. विरोधी पक्षांशी अधिवेशन घेण्यासंसद्भात सल्लासमलत केली नाही, अशी टीका त्यांनी केली
इंडिया आणि भारत असा नवा वाद सुरू झाला. यावरही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, विरोधकांच्या इंडियाचा धसका भाजप सरकराने घेतला आहे. त्यामुळंच त्यांनी प्रेसिडंट ऑफ इंडिया ऐवजी, प्रेसिडंट ऑफ भारत केलं. देशाचं नाव बदलण्यासाठी ते १४ हजार कोटी रुपये खर्च करायला तयार आहेत. एवढी भीती सरकारला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.