Download App

एकनाथ शिंदे यांचे वागणे म्हणजे मूह में राम, बगल में छुरी; चंद्रकांत खैरेंचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Chandrakant Khaire on Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यारून चांगलचं फटकारलं आहे. महत्व कशाल द्यायचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की, अयोध्येला? त्यांची श्रध्दा अयोध्येत असेल तर आमची श्रध्दा ही शेतकऱ्यांमध्ये आहे, असं शरद पवार म्हणाले होते. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांचं वागणं म्हणजे, मूह में राम, बगल मे छुरी आहे, असं त्यांनी सांगितलं.

अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकीय वातावरण हे चांगलचं तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जातेय. मात्र, अयोध्येचा दौरा बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे, असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. तर आता चंद्रकांत खैर अयोध्या दौऱ्यावर टीका करतांना म्हणाले की, मी कडवट हिंदुत्ववादी आणि धार्मिक आहे. मी देखील कारसेवा केली आहे. मात्र, काम सोडून मी देवदर्शनासाठी जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माण केले. परंतु, शिंदे यांचा थाट असा आहे की, जणू काही यांनीच राम मंदिर निर्माण केले आहे. एकनाथ शिंदे यांचं वागणं म्हणजे, मूह में राम, बगल मे छुरी आहे, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा समाचार घेतला.

पुण्यात क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; नऊ जण घेतले ताब्यात

नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केली. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन राज्यात नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. या सत्तांतरावर बोलतांना खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप खैरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी अगोदर राम मंदिर नंतर सरकार अशी घोषणा केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांचं असं चाललं आहे, जंस की, हेच फक्त रामभक्त आहेत. हेच धनुष्यबाणवाले आहेत. आम्ही कोणीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाऊन उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतात. पण, शिंदे हे विरोधकांवर टीका करण्यासाठीच अयोध्येला गेलेत का? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, प्रभू श्रीराम एकवचनी होते. मात्र, एकनाथ शिंदे हे अनेक वचनी आहेत, जे उद्धव ठाकरे, यांचे झाले नाहीत, ते प्रभू श्रीरामाचे काय होणार, असं खैरे म्हणाले.

 

Tags

follow us