Chandrashekhar Bavankule On Udhav Thackery : ‘स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे ( Udhav Thackery ) खरे गद्दार आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- 2 मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत नशेत झिंगून देवेंद्रजींवर टीका करत आहेत. असा पलटवार करत चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी सामनातील फडवीसांवरील टीकेला उत्तर दिले आहे.
‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने अस्वस्थता; फडणवीस, सांभाळा! सामनातून टीकेचे बाण
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नेहमीच भाजपवर विविध माध्यमातून टीका केली जाते त्यात खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि शिवसेनेचं मुखपत्र असणारं सामनाच्या अग्रलेखातून देखील नेहमीच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात त्यात आज पुन्हा सामनातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
Gadar 2: सनी पाजीचा ‘गदर2’ बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला चित्रपट
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
ट्विट करत बानवकुळेंनी ही टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीस जींच्या विरोधात गरळ ओकली. 2019 साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली. स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.’
किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून @Dev_Fadnavis’जींच्या विरोधात गरळ ओकली.
२०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 19, 2023
‘उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत. पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- 2 मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा.’