Download App

खरगेंचे मानसिक संतुलन ढळले, मर्यादा ओलांडल्या; बावनकुळेंचा घणाघात

Chandrashekhar Bawankule On Mallikarjun Kharge : काँग्रेस (Congress)अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi)आज जहरी टीका केली आहे. त्यांनी मोदींना विषारी साप असं म्हटलं आहे. त्यानंतर कॉंग्रेसवर जोरदार टीका सुरु झाली आहे. त्यातच आता भाजपचे (BJP)प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रस्त्यावर ईदची नमाज करणे पडले महागात, 1700 जणांवर गुन्हा दाखल

यावेळी ते म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगेंचे मानसिक संतुलन ढळले आहे, म्हणूनच ते विश्वप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वारंवार वाईट बोलतात. कर्नाटक निवडणुकीत खरगेंनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या. गांधी परिवाराला मोदींबद्दल आकस आहेच, अशी टीका केली आहे.

बावनकुळे म्हणाले की, मौत का सौदागरपासून सुरु झालेला काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ आज जहरीला साप इथंपर्यंत पोहोचला आहे. यांना कधीच चांगले शब्द सापडत नाहीत. बोलताही येत नाहीत. त्यांच्या शब्दकोशातच नाहीत. त्यांची सत्ता गेली, राज्ये गेली, मतदार गेले, समर्थक गेले, नेते गेले, खासदारकी गेली, घर गेले पण डोक्यातली विकृत विचारांची मस्ती जात नाही.

बावनकुळे म्हणाले की, कॉंग्रेसचे नेते शिव्या पडतात, वाईट बोलले जाते म्हणजे मोदीजींच्या वादळात काँग्रेसचा केरकचरा उडून जाण्याची वेळ नक्की झाली हाच याचा अर्थ होतो, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे. मोदींची लाट काँग्रेसचे कान, नाक आणि डोके बधीर करत आहे.

खरगेजी लक्षात घ्या, आम्ही जनतेच्या भल्यासाठी भारताच्या अमृतकाळाचे भान ठेवतो. तुम्ही अमृतकाळात विषाची आठवण ठेवता. तुमची संस्कृती विष पेरण्याची, समाजाला विभाजीत करण्याची आहे. म्हणूनच तुम्हाला वीष आठवते. तुम्हाला कर्नाटकी जनता माफ करणार नाही, अशी घणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर केली आहे.

Tags

follow us