देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे; बावनकुळेंचे मोठे वक्तव्य

नागपूर : मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बावनकुळे हे बोलले. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जो जो समाज फडणवीस यांच्याडे गेला, त्या समाजावरी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे […]

320626188_3124799891146243_7438197414178621782_n

320626188_3124799891146243_7438197414178621782_n

नागपूर : मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बावनकुळे हे बोलले. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जो जो समाज फडणवीस यांच्याडे गेला, त्या समाजावरी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे मी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीसांमागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. फडणवीसांना फक्त मुख्यमंत्री पदावर बसवण्याकरिता नाही, तर महाराष्ट्राचं भवितव्य हे देवेंद्र फक्त देवेंद्र फडणवीसच घडवू शकतात, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले.

सध्या महाराष्ट्रात शिंदे गट-भाजपचं सरकार आहे. आणि पुढची विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं हे परस्परविरोधी असल्याचं दिसून येतंय. यामुळे यावरून राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत.

महाविकास आघाडीने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात मुंबईत महामोर्चा काढला. या महामोर्चातून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसंच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला. या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. आणि आगामी निवडणूकही शिंदे यांच्या नेतृत्वात लढू असं फडणवीस म्हणाले होते. पण आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version