Download App

Chagan Bhujbal : होळीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या आयुष्याचा बेरंग झाला

मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला आमदार या धोरणावर आपल्या सूचना सभागृहात मांडणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

https://www.youtube.com/watch?v=vev7UU9ANZA

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात ( Farmer Loss ) नुकसान केले आहे. यावरून गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान द्यावे अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) हे आक्रमक झाले आहे. छगन भुजबळ यांनी सरकारकडे मागणी करत असतांना अवकाळी पाऊस आणि होळी यावरून सरकारला जोरदार हल्लाबोल केला.

अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तो हवालदिल झाला. त्याच्या संसाराची होळी झाली आहे. आणि इकडे नेते रंग उधळत आहे असा टोला छगन भुजबळ यांनी लावत गुजरात सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही अनुदानाच्या बाबत निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली. छगन भुजबळ यांनी कांदा, द्राक्ष यांसह राज्यातील सर्वच पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावरून छगन भुजबळ यांनी मदत मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी गुजरातच्या सरकारचा संदर्भ दिला.

Sanjay Raut ‘त्या’ वक्तव्यावर ठाम, ‘माझे विधान एका विशिष्ट गटापुरते मर्यादित’

महाराष्ट्रापेक्षा गुजरात खूप लहान आहे. पण त्यांच्या सरकारने कांदा पिकाला अनुदान दिले. वाहतुकीसाठी अनुदान दिले आहे. तर दुसरीकडे निर्यातीकरिता देखील अनुदान देण्यात येते. शिवाय आपल्या पेक्षा कांदा त्यांच्याकडे फारच कमी असतांना ते मदत करत आहे, तर आपण का करू नये अशी मागणी भुजबळ यांनी केली.

काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole ) यांनी देखील राज्यात अवकाळीमुळे बळीराजासमोर पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत आज इतर सर्व मुद्दे बाजुला करुन केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, राज्यात किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले, याविषयी माहिती मागितली आहे. तसेच, पंचनाम्यानंतर तत्काळ मदतीचे प्रस्तावही मागवले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Tags

follow us