Chhagan Bhujbal on sharad pawar : राष्ट्रवात अजित पवारांनी (Ajit Pawar) बंडखोरी केल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर आणि पक्षचिन्हावरच दावा ठोकला. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) सुनावणी सुरू झाली. कालच्या सुनावणीत अजित पवार गटाने आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा केला. तर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पवारच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, असं सांगितल्या जातं. दरम्यान, यावरून आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट पवारांशीच तुलना केली. तुम्ही संस्थापक अध्यक्ष, तर मी पहिला प्रदेशाध्यक्ष असं विधान त्यांनी केलं.
Israel Rocket Attack : 200 हून अधिक बळी, 500 जखमी,असंख्य इस्रायली नागरिक ओलीस
भुजबळ म्हणाले, ज्यावेळी शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी मी साहेबांचा उजवा हात म्हणून काम केलं. शरद पवार सांगतात की, मी राष्ट्रवादीचा संस्थापक अध्यक्ष आहे. मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं की, मी सुध्दा राष्ट्रवादीचा महाराष्ट्राचा पहिल्या प्रांताध्यक्ष आहे. आमचाही पक्ष बांधणीत खारीचा वाटा आहे, असा टोला भुजबळांनी लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्याचवेळी कळवणला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. पुढं बोलतांना ते म्हणाले की, मी काही कोर्ट कचेरी करणार नाही, असं पवार साहेब म्हणाले. पण, आता कालपासून बघतो आहे, स्वत: पवार साहेबच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले, अशी खोचक टीका केली.
त्यावेळच्या पक्ष चिन्हांची आठवण करून देताना छगन भुजबळ म्हणाले की, खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना माझ्याकडे विरोधी पक्ष नेत्याचा जो बंगला होता, तिथं झाली. तिथेच राष्ट्रवादीचा झेंडा कसा असेल हे ठरलं, चिन्ह तिथंच ठरल आणि तिथेच प्रतिज्ञापत्रे सादर केली. त्यावेळी आम्ही दोघांनी निवडणुकांचा प्रचार देखील याच चिन्हावर आणि झेंड्यावर केला. तुमचा वाटा खूप मोठा असेल, पण आमचा सुध्दा खारीचा वाटा आहे की नाही? आम्हीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आलोत.
भुजबळ म्हणाले की, सत्तेत असो वा नसो, प्रत्येक वेळी काम करत गेलो. मग तुम्ही कसं म्हणता की, काहीच केलं नाही. सर्व काही आहे, तर मग आम्ही का गेलो? याचे कारण तुम्हाला वारंवार सांगितले की, प्रतिज्ञापत्रावर सर्वांच्या सह्या आहेत, आम्हाला सत्तेत यायचे आहे, विकासकामे करायची आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे भुजबळ म्हणाले.