Download App

Chhagan Bhujbal : दिल्ली दौऱ्यात अजितदादा का नाही? भुजबळांनी दिलं नेमकं उत्तर

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे अचानक गायब होतात. त्यातून अनेक राजकीय चर्चा सुरू होतात. अजित पवार हे गायब झाल्यानंतर ते नाराज असल्याचे पुढे येते आणि त्याची कारणेही आहेत. काल पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चेत आले. मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार गैरहजर होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला गेले. तर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाचे सर्व प्रमुख नेते आणि आमदार जमले. या घडामोडींनंतर अजितदादा राज्य सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. यावर आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.

नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला मुश्रीफांची भेट, ‘प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होणार’

भुजबळ म्हणाले, दादांना थ्रोट इन्फेक्शन (घशाचा संसर्ग) झाल्यामुळे ते दिल्लीला जाऊ शकत नाहीत. बैठक अगोदर ठरली होती म्हणून आम्ही जात आहोत. आज कॅबिनेट होती, त्यांनी निरोप दिला की आज मी येणार नाही तुम्ही मिटींग चालवा. जर दादा थ्रोट इन्फेक्शनमुळे देवगिरीतून मंत्रालयात जाऊ शकत नाही. तर दिल्लीला कसे जातील? माणूस आजारी पडू शकत नाही का? दगदग, धावपळ, जागरणामुळे माणूस आजारी पडू शकतो. यानंतर पत्रकारांनी दादांना राजकीय आजारपण आलंय का असा प्रश्न विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले, दादांना कधीच राजकीय आजारपण येणार नाही काळजी करू नका, असे भुजबळ म्हणाले.

सुनील तटकरेंनीही केला खुलासा

पक्षाच्या नेत्यांची दर मंगळवारी अजित पवार यांच्या घरी बैठक असते. या बैठकीला प्रमुख नेते आले पण आमदाराची उपस्थिती तुरळक होती. त्यावेळी देखील काही राजकीय भूकंप होतो का ? याकडे लक्ष वेधले गेले. या सर्व घडामोडीवर अजित पवार आजारी असल्याने दिवसभर ते सर्वच कार्यक्रमाला गैरहजर होते असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला. केवळ प्रकृती खराब असल्याने आज बैठकीला उपस्थित नव्हते. आमदारांच्या बैठकीला देखील उपस्थित नव्हते. केवळ गैरसमज निर्माम करण्यासाठी अफवा पसरवली जात आहे. विरोधकांचा हा प्रयत्न चुकीचा आणि निंदनीय आहे, असे तटकरे म्हणाले होते.

कॅबिनेटला दांडी, प्रमुख नेतेही देवगिरीवर; नेमकी अजितदादांचे काय बिघडले ?

Tags

follow us