Download App

मी सध्या डबल ड्युटीवर, घरात बसलेल्यांनी मला सांगू नये; शिंदेंचा सणसणीत टोला

  • Written By: Last Updated:

CM Ekanath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारला आपल्या मुळ गावी आलेले आहेत.यावरुन मुख्यमंत्री हे तीन दिवस सुट्टीवर गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांकडूनही मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याचे बोलले जात आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या शैलीमध्ये विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. अडीच वर्षे घरात बसलेल्यांनी मला सांगू नये, असे ते म्हणाले आहेत.

https://letsupp.com/politics/the-chief-minister-who-has-more-seats-in-the-maha-vikas-aghadi-38991.html

मी सुट्टीवर नसून सध्या डबल ड्युटीवर आहे. मी कधीही सुट्टी घेत नाही. याठिकाणी येऊन मी दापोला येथे होणाऱ्या ब्रीजचे काम देखील पाहिले आहे. आरोप करणाऱ्यांना ते करुद्यात. त्यांना दुसरे कोणतेही काम नाही, असे शिंदे म्हणाले आहेत. आता त्यांनी आम्ही घरी बसवले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय दुसरे काहीही काम नाही. आम्ही त्यांच्या आरोपांना कामाने उत्तर देऊ, असे टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पडद्यामागेही काही हालचाली घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांचा या दौऱ्याचे  कोणतेच नियोजन नव्हते. पण मुख्यमंत्र्यांनी मी कधीही रजा घेत नाही, असे सांगत या चर्चांना उत्तर दिले आहे.

Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून त्यामुळे ते आपल्या गावी जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर मंत्री उदय सामंतांनी बोलताना ते आपल्या गावच्या जत्रेसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गावच्या जत्रेला गेल्यावरही जर कोणी मुख्यमंत्री नाराज असल्याचे म्हणत असतील तर त्यांचा नागरी सत्कार जत्रेतच केला पाहिजे, असे सामंत म्हणाले आहेत.

Tags

follow us