Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणीत जे काय व्हावं ते नियमानुसार, लोकशाहीमध्ये कायद्यानुसार निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन […]

Untitled Design (79)

Untitled Design (79)

पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणीत जे काय व्हावं ते नियमानुसार, लोकशाहीमध्ये कायद्यानुसार निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकाच मंचावर हजेरी लावली.
YouTube video player
मुंबईमधील ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर सांगितलं की, गेल्या काही महिण्यांपासून राज्यभरातून अनेक नेते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्य सरकारवर आपला विश्वास दाखवत आहेत. त्यामुळं ही मोठी गोष्ट आहे. त्यांचं मी स्वागत करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, साखर उद्योग सर्वात महत्त्वाचा उद्योग आहे. त्यामुळं शेतकरी आणि साखर उद्योजक या दोघांनाही सांभाळलं पाहिजे, म्हणून आज हा महत्वाचा कार्यक्रम शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं या कार्यक्रमाकडं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Exit mobile version