Download App

स्मरणशक्ती सिलेक्टीव्ह असून चालत नाही, पवारांनीही संघाविषयी गौरवोद्गार काढले; चित्रा वाघांचा टोला

  • Written By: Last Updated:

Chitra wagh on Supriya Sule : राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar)गटाला आपला फोटो लावू नये, असं बजावलं. त्यानंतर आता अजित पवार गटाच्या होर्डिंगवर शरद पवारांचे नव्हे, तर यशवंतराव चव्हाणांचे फोटो लावलेले दिसत आहे. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) एक्सवर पोस्ट लिहित अजित पवार गटावर निशाणा साधला. मी आरएसएसपासून चार हात दूर राहिलो, असं लिहित त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची आरएसएस विरोधी भूमिका होती, हे सांगितलं. याला आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

दोहात अभिनेता अपारशक्ती खुराना आणि डेव्हिड बेकहॅम यांची खास भेट 

चित्रा वाघ यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, स्मरणशक्ती सिलेक्टीव्ह असून चालत नाही, महाराष्ट्राच्या मोठ्या ताई… पुलोदचे सरकार होते, तेव्हा यशवंतराव मोहितेंनी 7 एप्रिल 1979 रोजी विधानसभेत रा. स्व. संघाच्या पथसंचालनावर बंदी आणण्याची मागणी केली. उद्देश पवार साहेबांचे सरकार पाडणे हाच होता. त्यावेळी जनता पार्टीचे कुर्ल्याचे आमदार शमसुद्दीन हक खान हे सभागृहात बोललेय त्यावेळी ते सभागृहात म्हणाले, ‘मैं भी एक मुसलमान हूँ और हिंदुस्थान में रहनेवाला हर मुसलमान हिंदू है. हिंदू कि व्याख्या यह है की, हिंदूस्थान में रहनेवाला हर आदमी चाहे किसी की भी जाती का हो हिंदू कहलाएगा.’, अशी पोस्ट वाघ यांनी लिहिली.

वाघ यांनी लिहिलं की, राष्ट्र सेवा दलाचे गुलाबराव पाटील यांचेही पाठोपाठ भाषण झाले आणि त्यांनी संघाच्या तेव्हाच्या गणवेशावरुन खिल्ली उडविणार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आरएसएसची चड्डी ही राष्ट्राभिमानी आहे, चारित्र्यवान आहे, शिस्तबद्ध आहे. संघावर बंदी आणण्यापेक्षा त्या तोडीच्या संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या चर्चेनंतर पवार साहेबांचे सरकार वाचले. बाकी रा. स्व. संघाच्या सेवाकार्याबद्दल खुद्द पवार साहेबांनी काढलेले गौरवोद्गार तुम्हाला ठावूक आहेतच, असा टोला वाघ यांनी लगावा.

सुप्रिया सुळेंचं ट्वीट काय?
सुप्रिया सुळेंनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. संदर्भ देतांना त्यांनी पुस्तकाचे नाव, पान नंबरही दिले. त्यांनी कृष्णकाठ या पुस्तकाचा मजकूर पोस्ट केला. तो असा- मी समजलो की, यांना (डॉ. हेडगेवार) फक्त एका विशिष्ट एका वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे. तेव्हापासून आर.एस.एस म्हटले की, मी चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, अशी पोस्ट अशी पोस्ट सुळेंनी लिहिली.

एकीकडे यशवंतराव चव्हाण यांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे यशवंतराव चव्हाण यांनी ज्यांचा विरोध केला. त्यांच्या सोबत जायचं, हा अजित पवार गटाचा विरोधाभास सुळेंनी दाखवला. त्याला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या टीकेला शरद पवार गट किंवा सुप्रिया सुळे काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us