‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत फडणवीसांचं ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर, मुंबईत आरोप-प्रत्यारोपांचा जलसा…

मराठी माणूस संकटात आहे तर तीस वर्षे काय कंचे खेळत होतात का? या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर दिलंय.

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis On Thackeray Brothers : मराठी माणूस संकटात आहे तर तीस वर्षे काय कंचे खेळत होतात का? याला जबाबदार कोण आहे? २५ वर्षे महापालिकांमध्ये खुर्च्या तोडण्याचं काम केलं, असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे बंधूंना दिलंय. महापालिका निवडणुकीनिमित्त काल मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा पार पडली. यावेळी फडणवीस बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, एवढी वर्षे तुमची सत्ता असूनही मराठी माणूस संकटात असेल तर चुल्लूभर पानीमें डुब मरो. मला आव्हान देतात आदित्यशी चर्चा करा. आदित्यशी चर्चा करायची असेल तर आमची उमेदवार शीतल गंभीरही पुरेशी आहे. उद्या दिवसभरात आदित्य ठाकरेंनी सांगावं आमच्याकडून शीतल गंभीर येईल, करु, असं खुलं चॅलेंजही फडणवीस यांनी दिलंय.

डिजे लावून करायचे काय? आमदार संग्राम जगताप यांचा विरोधकांवर निशाणा, प्रभाग एकमध्ये जोरदार सभा

तसेच मुंबईकरांसाठी शेवटची निवडणूक, मराठी माणसांसाठी शेवटची निवडणूक असं सांगायचं. हा मराठी माणूस तो आहे ज्याने अटकेपार झेंडे लावले आहेत. आम्ही अन्याय सहन करणारे लोक नाहीत. ही मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई नाही, तुमचं अस्तित्व पणाला लागलं आहे. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही हे पुन्हा सांगतो, असा इशारा त्यांनी दिलायं.

मुंबईत भाजपकडून मनसेला मोठा धक्का; मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ

‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत प्रत्युत्तर…
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात लाव रे व्हिडीओ म्हणत ठाकरे बंधूंचे व्हिडीओ दाखवत आणि एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप दाखवले आणि म्हणाले आपण यांना उत्तर देण्याची गरज आहे का? उत्तर त्यांनीच दिलं आहे. जी सभा रविवारी झाली त्या सभेत तेच मुद्दे, तेच आवाहन सगळं होती. मुंबई कुणाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बापाने जरी यायचं ठरवलं तरीही तुटणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Exit mobile version