निवडणूक लादली तर आमची लढण्याची तयारी; राहुरी, बारामतीच्या पोटनिवडणुकीवर फडणवीसांचे मोठे विधान

CM Devendra Fadanvis-राहुरी व बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सर्वांनी एकमताने सहभागी होऊन निर्णय करावा.

Rahuri By Poll Devendra Fadnavis

Rahuri By Poll Devendra Fadnavis

CM Devendra Fadanvis On Rahuri and Baramati assembly bypoll: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पदुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा भारत निवडणूक आयोग आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन करणार आहे. याचबरोबर राहुरी (Rahuri ), बारामती विधानसभा ( Baramati assembly) मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. त्याचपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी राहुरीत मोठे विधान केले आहे.

राहुरी व बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सर्वांनी एकमताने सहभागी होऊन निर्णय करावा. त्यानंतरही निवडणूक लादली तर आमची लढण्याची तयारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी आले होते.

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेची वाईल्ड कार्ड एंट्री, पंचांशी गैरवर्तन प्रकरणी घातलेली बंदी उठवली

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. ​यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थित होते.

आखातातील युद्धसंकटामुळे तेथील भारतीय चिंतेत; भारतात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या 30% ने वाढली

राहुरी विधानसभेचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने राहुरी विधानसभेची मतदार यादी तयार केलीय. शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले हे येथून निवडणूक लढणार आहेत. तर माजी मंत्री व माजी आमदार प्राजक्त तनपुरेही हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. पण प्राजक्त तनपुरे यांची काही दिवसांपासून राजकीय भूमिका बदलली आहे. ते हिंदुत्ववादी विचारावर बोलू लागले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्या बारामतीतून पोटनिवडणूक लढणार आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकते.

Exit mobile version