Devendra Fadanvis On Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी बदलण्याचा प्रयत्न केला असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं आहे. सध्याचं सुरु असलेलं राजकारण आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवरायांवर केलेल्या विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
October 2026 Rules : 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 महत्त्वाचे आर्थिक नियम; जाणून घ्या सर्वकाही
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही आव्हाने ही फक्त महाराष्ट्रापुरती नाहीत तर संबध मानव जातीपुढची आहे. जलवायु प्रदुषण हे त्यापैकी एक आहे. कोकणाला दैवी देणगी आहे. कोकणची नैसर्गिक संरचना फक्त महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे संरक्षण करते. चेरापुंजी नंतर सगळ्यात जास्त पाऊस सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पडतो. रीव्हर लिंकिंगमध्ये आम्ही सांगली, साताऱ्याचे पाणी मराठवाड्याला घेऊन जाऊ, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
तसेच मी असे मानतो की या देशातील सांस्कृतिक फेरबदल आणि आपण सगळे जे स्वता:ला हिंदु म्हणवून घेतो ते RSS मुळे आहे. संघ नसता तर डाव्या विचारांनी हा देश नष्ट केला असता,असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी म्हणून उदयास आले आहे. जिथे ३०,००० हून अधिक स्टार्टअप्स असून ते भारतातील एकूण स्टार्टअप्सच्या १८ टक्के असल्याचाही दावा देवेंद्र फडणवीस
यांनी केला आहे.
रहस्य, भय अन् नियतीचा थरारक खेळ; ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, युवकांच्या नेतृत्वाखालील संशोधन आणि नवोपक्रम राज्याला जागतिक नवोपक्रम केंद्र बनण्यास मदत करू शकतात, असा दावाही त्यांनी केला. दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स येथे गेट्स फाउंडेशन आणि समग्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’च्या चौथ्या आवृत्तीत बोलताना फडणवीस म्हणाले की, वर्गखोल्या आणि हॅकेथॉनमध्ये निर्माण झालेल्या कल्पनांपासून ते इनक्यूबेशन, तंत्रज्ञान, बाजारपेठा आणि अंमलबजावणीपर्यंतच्या संपूर्ण साखळीला व्यापणारी एक नवोन्मेष परिसंस्था उभारण्यासाठी सरकार काम करत आ
