Download App

मोदी मुंबईत आल्यानं काहींना पोटदुखी…शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल

CM Eknath Shinde : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे – फडणवीस सरकार व महाविकास आघाडी यामध्ये आरोप – प्रत्यारोप हे सुरूच आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोनदा मुंबईमध्ये आले होते. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता यालाच प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मोदी मुंबईत आल्याने काहींना पोटदुखी झाली मात्र होऊद्या. आपण अशांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरु केला आहे. अशा शब्दात शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

एका आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, केंद्राच्या अर्थसंकल्पात राज्याला भरीव निधी मिळाला आहे. हा डबल इंजिन सरकारचा फायदा आहे. तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आपण केंद्र सरकारकडे निधी मागितला पाहिजे. नागरिकांच्या सुविधेसाठी आपण केंद्राकडून निधी मंजूर करून घेतला पाहिजे. यानिधीमुळे राज्याच्या विकासाला हातभार लाभतो.

नागरिकांना सुविधा देण्यासाठी आपण केंद्राकडे वारंवार निधीची मागणी केली. तसेच मोदींनी देखील तातडीने यास मंजुरी दिली. मोदी स्वतः मुंबईमध्ये आले. मात्र त्यांच्या येण्यामुळे काहींना पोटदुखी झाली. मात्र काही हरकत नाही कारण आपण बाळासाहेब ठाकरे रुग्णालय अशांसाठी सुरु केले आहे. अशा शब्दात शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे…आमचं सरकार आलं की परतफेड होणारच

मुंबई 100 टक्के खड्डे मुक्त होणार म्हणजे होणारच
मुंबईतील खड्डे हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या उद्भवते. यावर उपाय म्हणजे काँक्रिटकारण होय. पुढच्या काही वर्षात मुंबईमधील रस्त्यांचे काँक्रिटकारण होणार. यामुळे मुंबई हे 100 टक्के खड्डे मुक्त होणार म्हणजे होणारच असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags

follow us