Download App

‘आम्ही दिल्लीत मुजरे करायला नाहीतर…,’; विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर

Cm Eknath Shinde : आम्ही दिल्लीत मुजरे करायला नाहीतर जनतेच्या विकासकामांसाठी जात असल्याचं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी विरोधकांना दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीका-टीप्पणी केली जात आहे. विरोधकांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्र्यानी विरोधकांना दिल्लीला का जातो? याचं उत्तर चांगलचं खडसावून दिलं आहे. बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते.

चक दे इंडिया! पाकिस्तानला लोळवत आशिया चषकावर कोरलं नाव

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shine) म्हणाले, महाविकास आघाडी सरकारी अहंकारी होतं, त्यांना इगो होता. महाविकास आघाडी सरकराने कुठलाही पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला नाही. याउलट शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही जनतेच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारकडे जातो, विनंती करतो त्यांची मदत घेतो. त्याच्यावर विरोधक टीका करतात. तुमच्यासारखे दिल्लीत मुजरे करायला जात नाहीतर, जनेसाठी काही ना काही करायला जात असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

Jalna Maratha Andolan वर बोलण्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नकार; शरद पवार जालन्यात…

तसेच कोविड काळात देवेंद्र फडणवीसांनी राबवलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक बंद पाडल्या. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर योजना पुन्हा सुरु केल्या. 8 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचं काम सरकारने केलं, त्यानंतर ‘लेक लाडकी’ योजनेंतर्गत मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या खात्यात एक लाख रुपये ट्रान्सफर करणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे.

Raj Thackeray : ‘इथे सरकारचं चुकलं हे निश्चित’; लाठीमाराच्या घटनेवर राज ठाकरेंनी फटकारलं

काही दिवसांपूर्वीच भारताने चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान मोहिम यशस्वी करणारा भारत देश जगात पहिला ठरला आहे, जगात आपल्या भारताचं नाव उज्वल करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींबद्दल विरोधकांना जलसी, द्वेष आहे, मोदींनी गॅसचे दर कमी केले त्याचा गॅसवर असणाऱ्या इंडिया आघाडीलाही फायदा होणार असल्याची टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केली आहे.

दरम्यान, कागदोपत्रे मिळत नसल्याने माणूस कंटाळून थकत होता, कागदोपत्रांचा नाद सोडून देत होता. त्यामुळे आज आपण ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबवला. अशा योजना लोकांच्या दारात आणणांर देशातला पहिलं राज्य ठरलं असून देवेंद्र फडणवीसांच्या बंद पाडलेल्या योजना आम्ही सुरु केल्या असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज