Download App

‘वर्षा’वर गेल्यावर पाटीभर लिंब सापडली; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरएसएसच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला होता. त्यावर विधिमंडळात मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. माझ्यासाठी लिंबू टिंबूची भाषा करायला लागले आहेत. मी वर्षा बंगल्यावर गेल्यावर पाटीभर लिंब सापडली. त्यात सगळं होतं. लिंबू, टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली असल्याचा आरोपही शिंदे यांनी ठाकरेंवर केलाय.

रेशिमबागेत जाण्याबाबत शिंदे म्हणाले, आमच्यावर काय टीका करतात. मी पातळी सोडून बोलणारा कार्यकर्ता नाही. आमच्यावर रेशिमबागेत गेल्यानंतर कोणी रेशीम कीडा म्हणतोय. कोणी काय काय म्हणतंय. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आमच्या डोक्यात, आमच्या रक्तामध्ये आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे काम आम्ही करतो आहे. म्हणून आम्ही रेशिमबागेत गेलो. गोविंदबागेत गेलो नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

बाळासाहेबांचा फोटो चोरला असे म्हणतात. सहन करणाऱ्याची मर्यादा असते. कोणावर आरोप करतात, ज्याला सगळे अंडे पिल्ले माहित आहेत, त्याच्यावर. घराबाहेर बाहेर पडत नाही ते हिम्मताची भाषा वापरतात. महापूर, कोविडमध्ये आम्ही लढलो आहे. शिवसेनेसाठी लाठ्या, काठ्या खाल्ल्या आहेत. लाठ्या, काठ्यांचे क्रेडिट तुम्ही घेऊ शकत नाहीत. हे क्रेडिट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचे आहे, असे शिंदे म्हणाले.

बाप चोरल्याच्या आरोपावर शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, बाळासाहेबांनी जन्म दिला नसला तरी ते पितृतुल्यच होते. ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मांडीला मांडी लावण्याचे पाप कोणी केले. बाळासाहेबांचा वारसा चालविण्याचा अधिकार कोणाला आहे ते तुम्ही ठरवा आहे. बाळासाहेब विचारांशी गद्दारी कोणी केली, असा सवालही शिंदे यांनी केला.

Tags

follow us