Download App

Eknath Shinde ; ‘…तर अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’

Eknath Shinde on MLAs threatened : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमक्या मिळत आहेत. धमक्याचे हे सत्र सुरुच असून संभाजीनगरमधील शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना धमकीचं पत्र आलंय. ‘अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.

आमदार बोरनारे यांच्या धमकी पत्रांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आमदार बोरनारे यांनी धमकी आली आहे. त्यावर पोलीस काम करत आहेत. याचा शोध घेण्यासाठी आमचा गृहविभाग संक्षम आहे. अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत, असे ते म्हणाले. आमदार बोरनारे यांच्या नावाने नुकतंच एक निनावी पत्र आलं आहे. या पत्रातून त्यांना जीवनिशी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पत्राने संभाजीनगर शिवसेनेत खलबळ उडाली आहे.

बावनकुळेंना पक्षातच किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार ? ; पटालेंचा बावनकुळेंना टोला

दरम्यान, आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा संघाचे शिवसेना आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी सुरत आणि नंतर गुवाहटी गाठलं होतं. संभाजीनगरातील वैजापूर मतदार संघावर त्यांची पकड आहे. रमेश बोरनारे यांच्या घरी नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्राद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बोरनारे यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती वैजापूर पोलिसांना दिली आहे. वैजापूर पोलिसांकडून हे पत्र कुणी पाठवलं आहे, याचा तपास सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली आणि दारुच्या नशेत धमकी देणारा व्यक्ती उघडकीस आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील जीवेमारण्याची धमकी आली होती. त्यानंतर धमकी देणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी अटक केली होती.

Tags

follow us