Download App

अजितदादांनी सरड्यासारखेच रंग बदलले, नाना पटोले यांची जळजळीत टीका…

अजितदादांनी सरड्यासारखे रंग बदलले, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली आहे. दरम्यान, सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं जात असतानाच आता नाना पटोलेंनी अजित पवारांवर जळजळीत टीका केली आहे. विधीमंडळाबाहेर पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Congress : दुष्काळी तालुका जाहीर करा! भर पावसाळ्यात आमदाराचं विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन…

नाना पटोले म्हणाले, सरडा हा एक प्राणी आहे, तो वेळेप्रमाणे रंग बदलत असतो. काही दिवसांपूर्वीच सत्तेत गेलेल लोकं आता वास्तविकता लपवत आहेत. याचाच अर्थ सरडा आणि माणसांमध्ये फरक असतो. सरड्याचा गुण माणसांत येऊ नये म्हणून माणुसकीसाठी माणूस काम करीत असतो. त्यामुळेच त्याला माणूस म्हणतात. सरड्यासारखं कोणी होऊ नये, असा सल्लाही नाना पटोले यांनी अजित पवारांना दिला आहे.

https://letsupp.com/pune/pune-crime-news-lender-rape-on-woman-in-front-her-husband-72172.html

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत उभी पाडून अजित पवार आपल्या समर्थकांसह सत्तेत सामिल झाले आहेत. सत्तेत सामिल झाल्यानंतर आता अजित पवार समर्थकांना मंत्रिपदेही देण्यात आले आहेत तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं आहे. याच घडामोडी सुरु असताना विधानसभेचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.

त्यानंतर अजित पवारांना 1500 कोटींच्या निधीची तरतूद करुन सर्वच पक्षाच्या आमदारांना निधी मंजूर केल्याचं दिसून आलं. निधी वाटपावरुन विरोधी पक्षाचे आमदार आणि सत्तेतल्या आमदारांमध्ये भेदभाव केल्याचं आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य करीत भाजपवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं आहे. ते म्हणाले, भाजपने सत्तेत आल्यानंतर टोल वाढवण्याचं काम केलं आहे. राज्यात टोल निर्मिती वाढवल्याने टोलच्या माध्यमातून जनतेला लुटणं हा भाजपचा गोरख धंदाच असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us