Nana Patole News : लहान भाऊ अन् मोठा भाऊ नाहीतर मेरिटच्या आधारावरच जागावाटप होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षातील नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्मुलाच सांगितलायं. ते मुंबईत बोलत होते.
दबाव टाकून देवेंद्र फडणवीसांनी आमचं घर फोडलं; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा थेट खळबळजनक आरोप
नाना पटोले म्हणाले, लोकसभा निवडणुकीसारखीच आता विधानसभा निवडणुकीतही मेरिटच्या आधारावच जागावाटप व्हाव्यात, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीमध्ये लहान किंवा मोठा भाऊ अशी कोणतीही भूमिका राहणार नाही. राज्यात असलेलं शिवद्रोही, भ्रष्टाचारी, प्रकल्प पळवून नेणाऱ्या सरकारला सत्तेतून हद्दपार करणे हाच आमचा उद्देश असून लहान, मोठा भाऊ, कोणाला किती जागा मिळतील, हे महत्वाचं नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितलंय.
तसेच जागावाटपाबाबत सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. जागावाटपासाठीची पहिली बैठक झाली असून पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्यावतीने समोपचाराने जागांची घोषणा करण्यात येणार असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलंय.
अजित पवारांनी तक्रार केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा; फडणवीसांकडून मात्र पाठराखण, काय आहे प्रकरण
कुठल्या राजकीय पक्षाला कोणतं राजकारण करायचं असेल ते त्यांनी करावं. विरोधकांनी महाराष्ट्राचं नाटक केलंच आहे. मला सुरक्षा द्या असं पत्र आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलं होतं पण राज्यापालांनी त्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली हे सर्वांत मोठं नाटक आहे. महायुतीचे लोकं आमदारांना विकत घेण्याचं काम करीत आहेत लोकशाहीच विकत घेण्याचं काम हे लोकं करीत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. महाराष्ट्राची अब्रू ही लोकं वेशीला टांगताहेत ही अब्रू वाचवण्याचं काम काँग्रेस करीत असल्याची जहरी टीका नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांवर केलीयं.
टेक्सस्टाईल पार्कला मंजुरी नाही तर भूमिपूजन कसं केलं?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी विदर्भात टेक्सस्टाईल पार्कच भूमिपूजन केलं होतं. जर या टेक्सस्टाईल पार्कला मंजुरी नव्हती तर मग भूमिपूजन केलंच कसं? लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच भाजपच्या नेत्यांनी अमरावतीत टेक्सस्टाईल पार्क उभारणार असल्याची घोषणा केली होती. खोट्या घोषणा करणे हा भाजपचा गोरखधंदा असल्याची टीकाही नाना पटोले यांनी यावेळी केलीयं.