Congress Leader Prithviraj Chavan : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थ आहे. तसेच येत्या काळात ते
भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगत आहे. यातच आता याच अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही. या बातम्या मी वर्तमान पत्रातच वाचल्या आहेत. दरम्यान 16 आमदारांवर कारवाईची टांगती तलवार व कोर्ट काय निर्णय देणार यांनतर हे आमदार निलंबित झाले तर हा एक उपाय होऊ शकतो असे सूचक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे. यातच ते भाजपसोबत जाणार असल्याचा चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार जाहीरपणे अजित पवारांना पाठिंबा देत आहे. अजित पवार भाजपसोबत गेले तर आम्ही देखील जाऊ अशी भूमिका काही आमदारांनी जाहीर केली असल्याने या चर्चाना आता पाठबळ मिळू लागले आहे. दरम्यान याच अनुषंगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
आमदारांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड…नगरमधील धक्कादायक प्रकार उघड
चव्हाण म्हणाले, अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना असे वाटते आहे की अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं चव्हाण यांनी पुढे म्हटलं आहे. जरी काही अशा वावड्या उठल्या तरी असं काही होईल असं मला वाटत नाही, असं चव्हाण म्हणाल्या आहेत.