Prithviraj Chavan : पुणे व चंद्रपूरसह देशातील चार लोकसभा मतदार संघ रिक्त आहेत. खासदार गिरीश बापट आणि बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यात लोकसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या खासदारांच्या निधनानंतर पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांचे निधन होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. तरीही पोटनिवडणूक होत नाही. यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सरकारवर टीका केली. मोदी सरकार निवडणुका घ्यायला घाबरते, अशी टीका त्यांनी केली.
आज पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलतांना चव्हाण म्हणाले की, आज देशात चार मतदारसंघांना लोकप्रतिनिधी आहे. मात्र, पोटनिवडणूक घेतली जात नाही. पोटनिवडणुक घेण्यासंदर्भात घटनेत अतिशय स्पष्ट तरदूत आहे. नवीन सरकार गठीत व्हायला एका वर्षापेक्षआ अधिक कालावधी असेल तर सहा महिन्याच्या आता पोटनिवडणूक घ्यावी. मात्र, मोदी सरकार आपल्या राजकीय सोयीसाठी ह्या निवडणुका घेत नाही.
भाजपला पोटनिवडणूका घेण्याची भीती आहे. जर कसबा पेठच्या पोटनिवडणुकीसारखा या लोकसभा पोटनिवडणुकांचा निकाल लागला तर आगामी लोकसभेसाठी अडचण होऊ शकते. त्यामुळं पोटनिवडणुका घेतल्या जात नाही. घटनेचं उल्लंघन निवडणूक आयोगामार्फत केलं जात आहे,असं चव्हाण म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात मोठी वाढ
काही महिन्यांपूर्वी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला होता. कसबा पेठ हा भाजपचा मतदारसंघ असताना तेथे भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. या जागेवर मविआचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते.
कोणत्या मतदार संघात पोटनिवडणूक –
सध्या देशात लोकसभेच्या चार जागा रिक्त आहेत. उत्तर प्रदेशातील अंबाला येथील भाजप खासदार रतनलाल कटारिया यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाले. तेव्हापासून या मतदार संघाला खासदार नाही. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांना दोन वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर अन्सारी यांचं निधन झालं.