Download App

…म्हणून मोदींनी घाईघाईने 38 पक्षांची बैठक घेतली; पृथ्वीराज चव्हाणांची खरमरीत टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांना घाबरुन घाईघाईने 38 पक्षांची बैठक घेतली, असल्याची खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. इंडिया आघाडीची येत्या 31 तारखेला मुंबईत तिसरी बैठक पार पडणार आहे. इंडिया आघाडीच्या पहिल्या बैठकीपासूनच भाजपकडून निशाणा साधत टीका-टीप्पण्या केल्या जात आहेत. त्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईतील दादर भवन येथून ते बोलत होते.

नगरमध्ये मध्यरात्री प्रवाशांवर दरोडा, पळून गेलेले 3 दरोडेखोर अवघ्या दोन तासात जेरबंद

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, प्रत्यक्षात भाजप या आघाडीला घाबरली आहे, भाजपकडून इंडिया आघाडीवर होत असलेली टीका हास्यास्पद असून देशभरातील 28 पक्ष मोदी सरकार विरोधात एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीला घाबरून बंगलुरुमध्ये इंडिया आघाडीची दुसरी बैठक होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी घाईघाईने एनडीएची बैठक बोलावली होती. इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी व भाजपा घाबरले असल्याचंही चव्हाण म्हणाले आहेत.

Prabhas: काय… प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना धक्का

निधीवाटपावरुन वाद सुरु :
निधी वाटपावरूनही सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरु असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला असून सरकारधील वादाचा फटका शेतकरी, तरुण, कामगार, व राज्यातील गुंतवणूकीवर होत आहे. महाराष्ट्रात अस्थिर राजकीय परिस्थिती असल्याने कोणताही मोठा गुंतवणुकदार येत नाही. वेदांता फॉक्सनसारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला.

यावेळी बोलताना चव्हाण यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन भाजपवर टीका केली आहे. अॅपल कंपनीची गुंतवणूक इतर राज्यात केल्याने तरुणांचा रोजगार हिरावून घेतल्याचा घणाघातही चव्हाण यांनी केला आहे. तसेच जपान, चीन मध्ये कांदा 200-500 रुपये किलो आहे, कांदा निर्यात केला तर शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतील म्हणून केंद्र सरकारने तात्काळ निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us