Download App

Nana Patole : महाराष्ट्रातील ‘सिद्धू’ला हटवा : कॉंग्रेस नेते दिल्लीत; पक्षाध्यक्षांचीही घेतली भेट

Congress leaders againt Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्या पासूनच ते वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. कधी आपल्या भूमिकांमुळे तर कधी वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधात पक्षातील लोकांची नाराजी नेहमीच समोर आलेली दिसली आहे. तसं पाहिल तर कॉंग्रेस पक्षाला प्रदेशाध्यक्ष आणि नेते हा वाद काही नवा नाही. यामध्ये आता पुन्हा नाना पटोंलेविरोधात राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडेच तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी पुन्हा एकदा राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी नाना पटोलें विरोधात प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. या नाना पटोलेंविरोधात थेट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडेच तक्रार केली आहे. परिस्थिती बदलायची असेल तर प्रदेशाध्यक्ष बदला. अशी भूमिका विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे यांनी घेतली आहे.

Gajanan Maharaj : संत गजानन महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, शेगाव नगरी दुमदुमली

कर्नाटक निवडणुकांनंतर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होईल अशी आपेक्षा होती. मात्र नाना पटोले दिल्लीत गेले होते आणि या चर्चांना पूर्ण विराम मिळाला त्यानंतर आता पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे हे दिल्लीत गेले आहेत. त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेऊन पटोलेंची तक्रार केली आहे.

Gautami Patil : पाटील हेच आडनाव लावणार, मराठा संघटनेला गौतमीचं सडेतोड उत्तर

नाना पटोले एकला चलो रे ची भूमिका घेतात. पक्षातील नेत्यांनी विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे परिस्थिती बदलायची असेल तर प्रदेशाध्यक्ष बदला. अशी मागणी त्यांनी खरगेंकडे केली आहे. त्यामुळे या मागणीवर खरगे काय निर्णय घेताता? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाना पटोलेंच पद जाणार की, तेच प्रदेशाध्यक्ष राहतात.

Tags

follow us