Congress not dare to action against Pakistan for vote bank; Eknath Shinde criticizes : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानचा (Pakistan) हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली आहे. या माहितीनंतर भारताकडून पाकिस्तानावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पाकिस्तानवर एवढी मोठी कारवाई केली आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. पाचही लोकांना उच्चायुक्तालयातून काढून टाकले आहे. पाकिस्तानींचा व्हिसा रद्द केला, अटारी सीमा बंद केली. पाकिस्तानींना तात्काळ देश सोडायला सांगितले आहे. सैन्याच्या तिन्ही दलाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सराकरने सैन्यावर विश्वास टाकत त्यांना देशाच्या रक्षणासाठी पु्र्ण स्वातंत्र्य दिले आहे. असं पहिले कधी झालं नव्हतं. पुलवामा सर्जिकल स्ट्राईक देखील मोदी यांच्याच सरकारने केला आहे.
सैन्याच्या जवानांवर हल्ला झाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली होती. आता देखील पाकिस्तानवर कडक कारवाई केली जाईल. ते नामशेष होतील अशी कारवाई करायला सुरूवात झाली आहे. तसेच बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांनी सकाळी सैन्याच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक घेतली. ज्यामध्ये पाकिस्तानला कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा करून सर्व सामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
#WATCH | #PahalgamTerroristAttack | Thane | Maharashtra Deputy CM Eknath Shinde says, " For the first time, PM Modi has taken the strictest action against Pakistan…5 people were removed from High Commission, Indus water treaty was suspended…Attari Border was closed, Pakistani… pic.twitter.com/mcoOfWzpE6
— ANI (@ANI) May 1, 2025
जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांना वेग; महाराष्ट्र दिनी मंत्री विखेंची ध्वजारोहनानंतर माहिती
त्यामुळे एकीकडे मोदी हे पाकिस्तानवर कठोर तर जनतेप्रती सहानुभूती देखील दाखवली आहे. मात्र कॉंग्रेसने अत्तापर्यंत पाकिस्तानवर अशी कडक कारवाई करण्याची हिमंत केली नव्हती. कारण जर त्यांनी दहशतवाद्यांवर कारवाई केली. तर त्यांची व्होट बॅंक दुरावण्याची भीती त्यांना आहे. पण यात लाखो सैनिक शहीद झाले त्याचा हिशेब कॉंग्रेसला द्यावा लागेल. पण पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानवर कडक कारवाई करत त्यांचं नामोनिशाण मिटवतील. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहलगाम हल्ल्यावर बोलताना म्हटले आहे.