Download App

Rajan Vichare : पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जाताहेत

  • Written By: Last Updated:

ठाणे : मिंधे गटाकडून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मिंधे गटाने कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडलं नाही. परवा ठाकरे गटाच्या पदाधिकारी असलेल्या रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांच्यावर शिंदे गटाने जबर हल्ला केला. सध्या त्या लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, रोशनी शिंदेला अटक करण्यासाठी तिथंही सध्या पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला, याचा जाहीर निषेध. 9 महिन्यांपासून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी केला.

रोशनी शिंदे यांच्याविषयी पोलिसांनी घेतलेल्या निष्क्रीय आणि पक्षपाती भूमिकेविरोधात आज ठाण्यात महामोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात बोलतांना राजन विचारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. विचारे यांनी सांगितलं की, ठाण्यात मिधें गटाची गुंडगिरी वाढली आहे. रोशनी शिंदे यांच्यावर मिंधे गटाने महिलांकरवी भ्याड हल्ला केला. निंदणीय बाब असून ठाण्याच्या संस्कृतीला शोभणारी बाब नाही. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, पोलिस प्रशासन निर्धास्त असल्याची टीका त्यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळं गृहमंत्र्यांवर विरोधकांकडून कायम टीका केली जात आहे. सोमवारी ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना जबर मारहाण झाली. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाली असल्याचा आरोप केला जातो आहे. रोशनी शिंदे यांनी समाज माध्यमांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी पोस्ट लिहिल्यानं त्यांना मारहाण करण्यात आली, असं सांगितल्या जातं आहे. दरम्यान, रोशनी शिंदे यांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाई न करता उलट रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळं आज मोर्चा काढण्यात आला होता.

आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज…

यावेळी विचारे म्हणाले, रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांची विचारपूस केली. त्या भेटीनंतर ठाकरेंनी पोलिस आयुक्तांना भेटण्याचं ठरवलं. मात्र, पोलीस आयुक्त कार्यालयात गेल्यावर आयुक्तच कार्यालयातून गायब झाले होते. सध्या रोशनी शिंदे यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी केलेली तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली नाही. उलट त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. आणि आता रोशनी शिंदेला अटक करण्यासाठी लीलावती इथंही सध्या पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला, याचा जाहीर निषेध. 9 महिन्यांपासून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे.

विचारेंनी सांगितलं की, मिंधे गटाच्या दादागिरीला आम्ही भीत नाही. मात्र, आज पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांनी कुठल्याही पक्षाच्या कार्यकत्ययांना सोडलं नाही. काही दिवसांपूर्वी ठाण्यात एमएससीबीची लाईट बंद करून ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली. त्यांच्या आईने पोलिसांत तक्रार केली. मात्र, त्या माऊलीची पोलिसांनी कुठलीही तक्रा घेतली गेली नाही. उलट पोलिस खोट्या केस दाखल करत आहेत.

दरम्यान, ज्या शिवसेनेला ठाण्यांनी सत्ता दिली होती, ती सत्ता कायम ठेवण्याची आम्ही प्रयत्न करू. अन्यायाला वाचा फोडून ठाणेकरांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.

Tags

follow us