Download App

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

Shivsena MLA Sanjay Shirsat : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच अजित पवार यांच्या पहाटेच्या शपत विधीला जोडे मारो आंदोलनं केलं होतं. जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्यासोबत कधीच नव्हते आणि राहणार नाही. आव्हाड यांनी शरद पवार हेच माझे नेते असल्याचे यापूर्वीही सांगितलं होत. तसेच शरद पवार हे माझे बाप असल्याचे देखील आव्हाड बोलले होते. असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीची सत्ता असताना जर वर्षावर कोणाला प्रवेश होता ते म्हणजे जितेंद्र आव्हाड होते. जितेंद्र आव्हाडांनीच अजित पवार यांच्या पहाटे शपथ विधीवरून जोडे मारो आंदोलन केले होते. ते आता दादांना बोलत आहेत. आव्हाड हे अजित पवार यांच्यासोबत कधीच नव्हते आणि राहणारही नाहीत, अशा शब्दात शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला.

सामानाचा संपादक कधी नेता झाला?
खासदार संजय राऊत यांचा देखील खरपूस समाचार घेतला. राऊत यांच्यावर टीका करताना शिरसाट म्हणाले, बरोबर आहे कोण संजय राऊत? सामानाचा संपादक कधी नेता झाला? त्यांनी आपली लेखणी चालवावी. राजकारण करत असताना दुसऱ्यांच्या मतावर निवडून येणाऱ्यांना ग्राउंड लेव्हलवर काय चालत ? हे काय कळणार. ग्राउंड लेव्हलवर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न काय असतात हे त्यांना काय माहित अशा शब्दात शिरसाट यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

तसेच पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, राऊत यांना टीका करणे व आपणच पक्षाचे प्रमुख असल्याच्या अविर्भावात राहत असतात. हे मात्र चुकीचं आहे. यामुळे आम्ही संजय राऊत यांना कधीच महत्व दिले नाही. तसेच संजय राऊत हे आता महाविकास आघाडीची देखील धोक्याचे बनत असल्याचे उद्धव ठाकरेंना कळत नाही आहे, अशी खंत त्यांनी यावेळी बोलताना दाखवली.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले…

दरम्यान शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट हा निर्माण झाला आहे. या दोन्ही गटातील नेतेमंडळी नेहमीच एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

Tags

follow us