Download App

अजितदादांचं मिशन विधानसभा निलेश लंकेंच्या पारनेरमधून; महिलांशी संवाद साधणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते महिलांशी संवाद साधणार आहेत.

Ajit Pawar Tour : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मागे राहिल्याचं दिसून येत नाही. येत्या 22 जूलै रोजी अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात महिलांसाठी घोषित केलेल्या विविध योजनांची माहिती देणार आहे. यासोबतच महिलांसोबत थेट संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिलीयं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Stree 2 Trailer: ती परत आलीय! राजकुमार राव- श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

सुनिल तटकरे म्हणाले, येत्या 22 तारखेपासून अजित पवार यांचा राज्यव्यापी दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात अहमदनगरमधील पारनेर तालुक्यापासून करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान, विविध योजनांसदर्भात महिलांना येणाऱ्या अडचणींबद्दल थेट संवाद साधणार आहेत. महिलांना येत असलेल्या अडचणी समजून घेत त्यावर पाऊले उचलली जाणार आहेत. पारनेरनंतर श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातही अजितदादा महिलांशी संवाद साधणार असल्याचं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलंय.

अहमदनगर शहरात सभा :
अहमदनगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यादरम्यान अजितदादांसोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे उपस्थित असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. महायुतीकडून अजित पवार गटाला चार जागा देण्यात आल्या होत्या. या चार जागांपैकी फक्त एकाच जागेवर अजित पवार गटाला यश मिळालं आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडून यावेत, यासाठी अजित पवार रणनीती आखणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीने जिंकलेल्या 54 जागांवर आम्ही दावा करणार असल्याचं भाष्य केलं होतं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभेला चार जागा अजित पवार गटाला देण्यात आल्या होत्या, आता विधानसभा निवडणुकीला अजित पवार दावा करतील तेवढ्या जागा मिळणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us