Ajit Pawar : राज्य सरकारकडून खासगी कंपन्या नेमून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या भरतीत आरक्षणही नाही असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भूमिका स्पष्ट केली. तसेच यामध्ये आपल्याला काहीच कारण नसतानी ट्रोल केलं जात असल्याने नाराजीही व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, काही एक कारण नसताना मला ट्रोल केलं जात आहे. काल मी दिवसभर मंत्रालयात होतो. एक लाख 50 हजार मुलामुलींची भरती राज्यात विविध ठिकाणी सुरू आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि काहीही बातम्या सोशल मीडियावर टाकल्या जातात.
.. तर मोदींचाही पराभव शक्य! चव्हाण यांनी सांगितला भाजपाच्या पराभवाचा फॉर्म्युला
भरतीसाठी आपण तीन कंपन्या निवडल्या आहेत. एमपीएससीमार्फतही भरती केली जात आहे. काही ठिकाणी तत्काळ माणसं भरावी लागतात. मागच्या सरकारच्या काळात काय घडलं. कुणावर कारवाई करण्यात आली हे सगळ्यांनाच माहिती आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्याचा निर्णय आत्ताचा नाही. मागच्या सरकारच्या काळातच हा निर्णय घेण्यात आला होता. त्या काळात कुणाकुणाच्या त्यावर सह्या हे देखील मी सांगू शकतो. आज ते सरकार नाह म्हणून लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं, आम्हाला बदनाम करायचं काम चालू झालं. मलाही कळतं. 32 वर्षांपासून मी राजकारणात आहे. बेरोजगारी आणि राज्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच राज्यात दीड लाखांची भरती करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, याआधी अजित पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च मोठा आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन-तीन कर्मचारी काम करू शकतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे आहे. त्यापैकी 2 लाख 40 हजा कोटींचा खर्च फक्त पगारावर होतो,असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरही विरोधी नेत्यांनी बरीच टीका केली होते. अजित पवार यांचे पुतणे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही खोचक शब्दांत टीका केली होती.
सत्तेतील सहभागासाठी रोहित पवारांचंच पहिलं समर्थन; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट !