Download App

मध्यरात्री एक वाजता उद्धव ठाकरेंनी फोन केला होता; फडणवीसांनी पुन्हा उघड केली गुपितं…

Dcm Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-ठाकरे गटामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं होतं? ती गुपितं उघड केली आहेत.

Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला,’तुमचा पगार…’ 

फडणवीस म्हणाले, 2019 साली भाजप-शिवसेनेला बहुमत मिळालं होतं. एका मध्यरात्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. ते म्हणाले मी अमित शाहांशी चर्चा केलीय, आम्हाला मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. त्यावर फडणवीस म्हणाले, आता सर्व आपलं ठरलंय, तुम्हाला काही काळासाठी मुख्यमंत्रिपद पाहिजे, हा निर्णय मी घेण्यास समर्थ नाहीये. त्यानंतर फडणवीसांनी अमित शाहा यांच्याशी संवाद साधून ठाकरेंच्या मागणीबद्दल सांगितलं होतं. मुख्यमंत्रिपदाबाबत वर्षानुवर्षे आपला फॉर्मुला ठरलेला आहे. यासंदर्भात कुठलीही तडजोड होणार नसल्याचं अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

बावनकुळेंचा 152 जागा जिंकण्याचा निर्धार; शिवसेना अन् राष्ट्रवादीची होणार कोंडी

तसेच तुम्हाला आणखी मंत्रिपदे हवे असतील तर ते देऊ पण भाजपचाच मुख्यमंत्री असेल. हे होणार नसेल तर तुम्ही बोलणी थांबवा. त्यावर हे जर होत नसेल तर युती होणं कठीण असल्याचं ठाकरे म्हणाले होते. त्या मध्यरात्रीच्या बोलणीनंतर तीन दिवसानंतर एक गृहस्थ आले अन् म्हणाले त्यांची पुन्हा बोलण्याची इच्छा आहे. त्यावेळी ते म्हणाले, आम्हाला पालघर लोकसभेची जागा द्या, त्यानंतर मी पुन्हा शाहांची चर्चा केली. शाहांनीही पालघरची जागा देऊन टाकण्याबाबत सांगितलं. आता मुख्यमंत्रीपदाचा विषय नव्हता. पालघरची जागा भाजपने खासदारासहित दिली. त्यानंतर युती झाली होती, असे फडणवीस म्हणाले.

बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाहा आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. त्यावेळी मीही मातोश्रीवर होतो, असे फडणवीस म्हणाले. त्यानंतर पत्रकार परिषद झाली.
PM Modi France Visit: PM मोदी फ्रान्सला रवाना, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत करणार डिनर

पत्रकार परिषदेत काय बोलायचं हे मराठी आणि हिंदी भाषेत रश्मी वहिनींसमोरही मी बोलून दाखवलं. त्यानंतर पत्रकार परिषदेत मी भूमिका मांडली होती. निवडणूक माझ्या नेतृत्वात होणार हे सगळं आधी ठरलेलं होतं. पण निवडणुकीनंतर आम्हाला मुख्यमंत्रिपद हवंय, आमच्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत, अशी ठाकरेंनी भूमिका घेतली, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, 2019 साली उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, याला बेईमानीशिवाय काही म्हणता येणार नाही, मोदींचे फोटो लावून तुम्ही मतं मागितले होते, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात. तुम्ही पाठीत खंजीर खुपसता, हा खंजीर फडणवीसांच्या पाठीत नव्हता हा खंजीर भाजपच्या पाठीत होता, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

Tags

follow us