भाजपच्या हप्तेखोरीचे माझ्याकडे पुरावे; अजित दादांचे भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

कुत्रे नसबंदी अभियानासह विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याचा उपमुख्यमंत्री पवार यांचा आरोप.

Untitled Design (196)

Untitled Design (196)

Deputy Chief Minister Ajit Pawar’s attack on BJP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये(Pimpari Chinchvad) आयोजित पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. अनेक वर्षांपासून महापालिका निवडणूक न झाल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांची गर्दी होणे साहजिक असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. अजित पवार(DCM Ajit Pawar) पुढे म्हणाले की, कुत्रे नसबंदी अभियानासह विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले असून, या योजनांमधून पैसे कसा लाटला गेला याची ठोस उदाहरणं समोर आहेत. या सर्व प्रकरणांत सत्ताधाऱ्यांची जबाबदारी निश्चित असल्याचा आरोप यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला.

महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार यांनी 2017 च्या निवडणुकांचा संदर्भ दिला. त्या काळात मोदी लाटेमुळे अनेकांनी पक्ष बदलल्याचे सांगत, विठ्ठलाच्या मूर्तीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा उल्लेख त्यांनी केला. त्यावेळी आरोप करणारेच आज पुन्हा महापौर पदासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरल्याचे त्यांनी नमूद केले.

‘त्या काळात मी शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. रस्ते, पाणीपुरवठा आणि रोजगार निर्मितीवर भर दिला. विविध माध्यमांतून तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा निधी उभा केला,’ असे सांगत त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. ‘जर विकासाचा दावा करायचा असेल, तर तेवढी तरी कामे दाखवावीत,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कल्याण-डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांचा करिष्मा; तब्बल 15 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध

महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना अजित पवार यांनी सांगितले की, स्थापत्य विभागावर सुमारे 1500 कोटी रुपयांचे दायित्व असून पाणीपुरवठा विभागावर 651 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र, एवढ्या खर्चानंतरही शहरात प्रत्यक्षात विकासकामे दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, ‘सध्या सर्वत्र लाटण्याचे काम सुरू आहे. जास्त दराने निविदा मंजूर केल्या जात आहेत आणि काही लोकांच्या मालमत्तेत अनपेक्षित वाढ झाली आहे.’ कुत्रे नसबंदीवर 71 लाख रुपये खर्च करूनही 20 हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांचा चावा बसल्याच्या घटनांवर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत उपरोधिक टिप्पणीही केली. भाजपच्या हप्तेखोरीचे माझ्याकडे पुरावे असून भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. एका व्यक्तीला परदेशात जाण्यासाठी कोणी मदत केली? असा सवाल यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे

महापालिकेचे प्रशासन पूर्णतः पोखरले गेल्याचा आरोप करत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ‘सत्ताधाऱ्यांना मस्ती आहे, पण शहराचे खरे हित कुणाच्या हाती आहे, हे जनतेने ठरवावे,’ असे ते म्हणाले. अजित पवारांच्या या आरोपांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आर्थिक व्यवहार, निविदा प्रक्रिया आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version